भविष्यात कुठल्याही स्मारकाची विटंबना होऊ नये – रामकृष्ण महाजन.

139

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – यवतमाळ शहरातील आझाद चौक येथील आधुनिक भारताचे शिल्पकार शिक्षणतज्ञ, सत्यशोधक, महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याला पाठीमागून डांबर फेकल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेच्या आम्ही धरणगावकर जाहीर तीव्र निषेध करतो यापुढे कुठल्याही स्मारकाची किंवा महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होऊ नये अशी दखल प्रशासनाने घ्यावी त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत. वरील विषयासंदर्भात लहान माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन यांनी नायब तहसिलदार लक्ष्मणराव सातपुते यांना निवेदन सादर केले.
यवतमाळ येथील घटनेचा जलद गतीने तपास व्हावा व दोषींना कडक शासन व्हावे ही सत्यशोधक समाज संघ धरणगाव तसेच शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर प्रेमी यांच्यावतीने नम्र विनंती करण्यात आली व महापुरुषांच्या पुतळ्यांसंदर्भात प्रशासनाने योग्य काळजी घ्यावी जेणेकरून भविष्यात अशा निंदनीय घटना घडणार नाहीत.
याप्रसंगी लहान माळीवाडा समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील, सामाजिक कार्यकर्ते एच डी माळी, सचिव दीपक महाजन, लक्ष्मणराव पाटील, गोरख देशमुख, सुनील महाजन, मनोज गुजर, कैलास पाटील, एस बी पाटील, दिनेश भदाणे, सुनिल देशमुख, जितेंद्र ओस्तवाल, मयूर भामरे, विजय चव्हाण तसेच शहरातील शिवराय- फुले – शाहू – आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.