प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले होते आयोजन

  69

   

  पुणे : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवडच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन लोखंडे भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
  यावेळी कामगारांना अल्पोपहार देऊन कामगार सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व स्वच्छता कामगारांचे विशेष कौतुक करण्यात आले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छ्ता कामगारांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
  याप्रसंगी आरोग्य मुकादम राजेश टोले, आंबादास भाट, विजय तलारे, विजय कांबळे, चंद्रकला पटेकर, सुनीता पवार यांच्यासह अनेक कामगार महिला व पुरुष उपस्थित होते.
  यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा व साप्ताहिक पालिका संदेशच्या संपदिका सौ मंदा बनसोडे, महिला उपाध्यक्षा व साप्ताहिक वंचित विचारच्या संपादिका उषा लोखंडे, सचिव व साप्ताहिक निर्मला टाइम्सच्या संपादिका निर्मला जोगदंड आदी पदाधिकारी, पत्रकार व कामगार उपस्थित होते.