बसस्थानका समोर ट्राफिक जाम झाली नित्याचीच बाब

    231

    अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
    गंगाखेड -शहरातील बसस्थानकासमोर ट्राफिक नित्याचीच झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दिनांक 2 मे गुरुवार रोजी ट्राफिक मुळे तब्बल दोन तास वाहतूक खोळंबली आज लग्नाची तारीख मोठी असल्याने बस स्थानकामध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे यामध्ये एस टी महामंडळाच्या गाड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे जवळच असलेले रेल्वे ब्रिज व रोडचे संथगतीने चालू असलेले काम तसेच बस स्थानकाच्या गेट समोर लावलेले हातगाडे ऑटो यांच्यामुळे वाहनांना अडकून पडावे लागत आहे. खाजगी वाहनधारकांना कसल्याही प्रकारची शिस्त नसल्याचे दिसत आहे या सर्व प्रकाराकडे बांधकाम विभाग पोलीस प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. रोडचे काम लवकरात लवकर करावे रोडचे काम झाले तर रोडचे रुंदीकरण वाढेल यामधून बस ना जाण्यास जागा जास्त मिळेल कारण गंगाखेड बस स्थानकावरून ग्रामीण तसेच लांब पल्ल्यांच्या एसटी बसची संख्या जास्त असून या बसेस ना जान्या येण्यास त्रास होणार नाही तसेच बस स्थानकाच्या समोर लावलेली हातगाडी ऑटोवाले व इतर वाहनधारकांना शिस्त लावावी असे सामान्य नागरिकांमधून बोलल्या जात आहे