तीन महिन्यापासून प्राथमिक शिक्षकांच्या वेतन विलंबास जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करा

    376

    रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
    चंद्रपूर -प्राथमिक शिक्षकांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला करण्यात यावे यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे त्यासाठी पी.एफ.एम.एस.,सी.एम.पी.,ई कुबेर प्रणाली सुरु करण्यात आली मात्र अजुनही वेतनाची आनलाईन प्रणाली यशस्वी झालेली नाही.दोन तीन महिने सी.एम.पी.प्रणालीद्वारे प्राथमिक शिक्षकांचे वेतन महिन्याच्या एक तारखेला झाले. आणि अडव्हांस टेक्नोलाजी म्हणून ई कुबेर प्रणाली वेतनासाठी उपयोगात आणली पण पूर्णत: अपयशी ठरलेली आहे परिणामी गेल्या मार्च एप्रिल या दोन महिन्याचे वेतन अजुनही झालेले नाही त्यामूळे प्राथमिक शिक्षक आर्थिक विवंचनेत आहेत व आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्जाच्या व्याजाचा बोजा वाढत आहे, कर्ज वसुलीसाठी बँकेकडून तगादा सुरू आहे. मार्च २०२४ ला काही मोजक्याच अर्थकारण केलेल्या शिक्षकांचे थकीत देयके शालार्थ वेतन प्रणाली चे कनिष्ठ सहायक यांनी मंजूर करून काढले. त्यांची खाते क्रमांक चुकीचे टाकले आणि घाईगडबडीत सर्वं घोळ झाला. काही शिक्षक सेवानिवृत्त, काही मयत अशांचे थकीत देयके काढतांना खाते क्रमांक चुकीचे नोंदवून सारा गडबड घोटाळा करण्यात आला. त्याचा त्रास सर्वं कार्यरत प्राथमिक शिक्षकाना भोगावे लागत आहे. याला सर्वस्वी जबाबदार शालार्थ वेतन प्रणाली चे लिपिक जबाबदार आहेत. त्या 26 शिक्षकांचे ई कुबेर प्रणालीतील बिल क्लिअर होणार नाही तोपर्यंत नवीन मार्च एप्रिल चे बील ई कुबेर मध्ये नोंदविले जाणार नाहीं असे लेखा व वित्त विभागाचे म्हणणे आहे. असे चुकीचे धोरण अवलंबिनाऱ्या कर्मचाऱ्यावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने आज मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदनाद्वारे केलेली आहे. भेटीचे शिष्टमंडळात राज्यनेते विजय भोगेकर, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, जिल्हा सरचिटनिस सुरेश गीलोरकर, कोशाध्यक्ष सुनिल कोहपरे, दिवाकर वाघे, जीवन भोयर, लक्ष्मण खोब्रागडे, किशोर येनगंटीवार, विलास मोरे, रमेश कांबळे, यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.