बाभुळगाव येथील पत्रकार विकास पाटील साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फ़िल्म प्रोडक्शनच्या वतीने पुरस्कार सोहळा संपन्न

186

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव : सामाजिक राजकीय आणि पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन च्या वतीने साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी होणाऱ्या पुरस्कारा साठी धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव या छोट्याशा गावातून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विकास पाटील यांना साईबाबाची पुण्यनगरी शिर्डी येथे साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दि.३ में रोजी शिर्डी येथील सिद्ध संकल्प येथे ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फ़िल्म प्रोडक्शनच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुदाम कचरू संसारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर कालाड, उत्तमराव पाटील, साई वासनिक, सतीष खंडविकर, काळुराम ढोबळे, सोपानराव हिरमळ, डॉ. रविन्द्र पाटिल, डॉ. अजय वारूळे, सीमा सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.सामाजिक, राजकीय, चित्रपट सृष्टीतील आणि पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन च्या वतीने साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी साईबाबाच्या पावन भूमित चित्रपट सृष्टीतील मान्यवरांच्या हस्ते विकास पाटील यांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सुनंदा सूर्यवंशी, राजा भालेराव, राजू शेठ, प्रतीक्षा सरकटे कु.शितल वाघ, संजय ढाकरके, राजेश काळे, सलीम सौदागर, बाळासाहेब बोराडे, गोरख भंडारी, मधुकर बनसोडे, नंदन खरे, पांडुरंग गोरे,वजीर भाई शेख, शामराव काळकुंड, अर्चना परदेशी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.