महात्मा बसवेश्वर यांची893 वी जयंती उत्साहात साजरी.

121

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515 गंगाखेड :- महात्मा बसवेश्वर यांच्या 893 व्या जयंती निमित्त स्वामी मठ संस्था गंगाखेड येथे उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी संभाजी वाडीवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जीवन चरित्रावर कुमारी प्राची गोरखटे यांनी विचार मांडले. जयंती निमित्त बोलताना संभाजी वाडेवाले म्हणाले की, महात्मा बसवेश्वर यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे. महात्मा बसवेश्वर जयंती कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी राजेश गौरकर,चंद्रशेखर अष्टेकर,माधव मंदोडे, बाबुराव खेडकर,शिवप्रसाद कल्याणी, किशनराव बलोरे,महारुद्र टेकाळे, सोमेश्वर दामा,शंकर मंदोडे,सुभाष स्वामी,बापूराव निटुरे, गजानन खेडकर,बाळासाहेब राखे,संजय अप्पा धुळे, संगमेश्वर काडवदे, सुर्यंकांत लांडगे,वीरशैव महिला भजनी मंडळ व पलसिद्ध स्वामी महिला भजनी मंडळ याबरोबरच सर्व लिंगायत समाज बांधव महिला यांनी परिश्रम घेतले. जयंती उत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी वाडेवाले यांनी केले व आभार प्रदर्शन राजेश्वर गौरकर यांनी केले.