सहा वर्षाच्या चिमुकल्याचा खुन व आजोबाची आपल्या राहत्या घरी आत्महत्या-दिघडी येथील घटना

    192

     

    ✒️सिध्दार्थ दिवेकर (उमरखेड तालुका प्रतिनिधी)

    उमरखेड (दि. १० जून) तालुक्यापासून २५ किलोमीटर दूर दिघडी या गावात काल दुपारच्या सुमारास सहा वर्षीय गौरव गजानन शिंदे याचा अज्ञाताने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली, व त्यानंतर दिनांक ९ जून रोजी सकाळी ६ वाजता मुलाच्या आजोबाने फाशी घेवून आत्महत्या केल्याने उमरखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

    चिमुकल्याचा रहस्यमय मृत्यू व त्यानंतर त्यांच्या आजोबाच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित
    केले असून त्यावेळी घरातील दोन व्यक्ती गमावल्याने शिंदे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

    सदर प्रकरणात उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

    दिघडी येथे नेहमीप्रमाणे आई सकाळी चिमुकल्या गौरवला घरी ठेवून मजुरीला गेली. सायंकाळी आई परत आली तेव्हा तीला आपल्या काळजाचा तुकडा घरी दिसला नाही.
    बाळ घरात नसल्याचे लक्षात येताच, आईचे मन कासाविस
    झाले. मुलगा कुठे गेला, याचा शोध तीने शेजाऱ्या पाजाऱ्याकडे घेतला मात्र मुलगा कुठेही सापडला नाही.

    गावात चिम्कला गौरव दिसत नसल्याने हुरहूर वाढली व गावकऱ्यांनी शोधाशोध सुरु केली, तेव्हा गावाला लागून असलेल्या एका उसाच्या शेतात गौरव चा मृतदेह उसाच्या पाला पाचोळ्याने झाकून ठेवल्याचे दिसून आले. चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याचे कळताच, आईने एकच हंबरडा फोडला.

    निरागस मुलाला उसाच्या शेतात कुणी आणले व त्यांचा जिव कशासाठी घेतला असे अनेक प्रश्नांनी माऊलीत्त्या मनात काहूर उठले.

    चिमुकल्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून
    पोलीसांनी मृतदेह उमरखेड येथे शवविच्छेदनासाठी आणला.
    तेव्हा गौरवचे आजोबा अवधूत राजाराम शिंदे (६०) रा. दिगडी हे सुद्धा सोबत होते.

    पण रात्री उशीर होणार असल्याने, ते रात्री घरी गेले असता आपल्या स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी सुद्धा आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आल्याने उलट
    सुलट चर्चेला उधान आले आहेत. मुलाच्या आजोबाच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही तसेच गौरव गजानन शिंदे याचा खुन कोणी व का केला? आणि आजोबा अवधुत शिंन्दे यांनी आत्महत्या का केली ह्याचा शोध घेण्याचे आव्हान उमरखेड पोलीसांसमोर आहे.