गोपाळ मंत्री राष्ट्रीय योग वीर पुरस्कारने सन्मानित

    88

    गंगाखेड (प्रतिनिधी).अखिल भारतीय योगी शिक्षक महासंघ व अखिल भारतीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने योग महाकुंभ 2024 चे आयोजन अयोध्या येथे होत आहे. ज्यामध्ये गंगाखेड येथील गोपाळ मोहनलाल मंत्री योगशिक्षक यांना राष्ट्रीय योग विर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा सन्मान संपूर्ण देशातील योग शिक्षक, प्रशिक्षक तसेच योगाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तथा योगाचा प्रचार, प्रसार करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. यामध्ये महर्षी पतंजली योग रत्न सन्मान, स्वामी शिवानंद सरस्वती योग शिरोमणी सन्मान, स्वामी धिरेंद्र ब्रह्मचारी योगश्री सन्मान, श्री अयंगार योग भूषण सन्मान, आदीयोगी योग आयकॉन सन्मान, स्वामी विवेकानंद लाईफ टाईम अचीवमेंट सन्मान अशा वेगवेगळ्या श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये गंगाखेड येथील योगशिक्षक तथा योगप्रचारक गोपाळ मंत्री यांच्या योग क्षेत्रातील मागील दहा वर्षाच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना *महर्षी पतंजली योग रत्न* पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा कार्यक्रम अयोध्या येथील श्रीराम ऑडिटोरियम येथे 13 व 14 जून रोजी होणार आहे. 13 जूनला संपूर्ण देशातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या योगी विद्यार्थी यांच्या द्वारा योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप व 14 जूनला योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे व योगामध्ये उच्च शिक्षा प्राप्त करणारी विविध शिक्षक, प्रशिक्षक यांचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशातून योगाच्या क्षेत्रात कार्य करणारी दिग्गज मंडळी आपली उपस्थिती लावणार आहेत.अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश त्रिवेदी व सचिव आशिष अवस्थी यांनी गोपाळ मंत्री यांची राष्ट्रीय योगविर सन्मानासाठी निवड झाल्याचे पत्र दिले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून या निवडीबद्दल गोपाळ मंत्री यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.