मढेवडगाव मध्ये आढळले कोरोना बाधित रूग्ण

30

🔺दोन दिवस मढेवडगाव गाव पूर्णपणे बंद

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

 श्रीगोंदा(दि.6ऑगस्ट):- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे मागील चार महिन्यांपासून कोरोना विषाणू गावात येऊ नये यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडुन विशेष खबरदारी घेण्यात आली असतानाही अखेर मढेवडगांवात एका 42 वर्षीय महिलेला व तिच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हि महिला रांजणगाव येथील प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरीस होती. या कंपनीमध्ये पुणे व नगर जिल्ह्यातील अनेक गावांमधून महिला व पुरुष नोकरीस ये -जा करतात. मढेवडगाव व परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे
कोरोना पॉझिटिव आढळून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पासून गुरुवार दिनांक 6/8/20 ते शनिवार दि.8/8/20 पर्यंत गावात टाळे बंदी असणार आहे / गाव पूणपणे बंद असेल फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजे हॉस्पिटल व मेडिकल चालू रहातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद असतील
*(स्रोत -आरोग्य सेवा विभाग व कोरोना दक्षता समिती मढे वडगाव)*