मासळ परिसरात जनावरांना साथीचे रोग

20

🔺पशु वैधकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचा -जी.प. सदस्य गजानन बुटके यांचा आरोप

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.6ऑगस्ट)चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांना साथीचे रोग वाढलेले आहे .परंतु पशु वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी राहत नसून ते चिमूर पशु कार्यालयात फिरत असून तसेच पशु वैधकीय अधिकारी हे सुद्धा पशु लाभार्थ्यांकडून अवाजवी वसुली लूट करीत असल्याने पशु मालक त्रस्त झाले असून याची दखल जीप सदस्य गजानन बुटके यांनी घेत पशु वैधकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जीप सदस्य गजानन बुटके यांनी केली आहे.

चिमूर तालुक्यातील मासळ मदनापूर जीप क्षेत्रातील गावात पशु ना साथी चे रोग पसरलेले आहे पशूंच्या पायांना फोड येऊन सूज येत आहे बैलाना सुद्धा रोग आला असल्याने सध्या शेती हंगाम सुरू आहे परंतु पशु वैधकीय अधिकारी हे फार्मसी मधून घेऊन आणून ते अवाजवी ने विकून लूट करीत आहे शासन औषधी पुरवठा करीत असताना मात्र पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामीण जनतेला खोटी माहिती देत ते जवळपास प्रति लाभार्थ्यांकडून चारशे ते पाचशे रुपये घेत असल्याचा प्रकार घडला असून काही पशु मालकांनी हा प्रकार जीप सदस्य गजानन बुटके यांना कथन केले
तेव्हा त्यांनी तात्काळ पशु वैधकीय केंद्र पस चिमूर येथे जाऊन कान उघाडणी केली
पशु वैधकीय अधिकारी हे मुख्यालयी राहत नसून ते चिमूर मध्येच दिसत असतात जर एखादया चा पशु मरण पावला तर मृत पशु चिमूर पशु वैधकीय केंद्र चिमूर मध्ये आणून ठेवण्याचा इशारा देत ची पस अंतर्गत पशु कार्यालयाची व्यवस्था कोलमडली आहे.पशु विभागाने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी जी.प. सदस्य गजानन बुटके यांनी केली आहे..