डहाणू मध्ये हिंदू भगीनीने मुस्लिम बंधूना राखी बांधून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

20

✒️डहाणू(पुरोगामी संदेश नेटवर्क)

डहाणू(दि.9ऑगस्ट):-देशात सर्वत्र अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयन्त काही सक्ती करीत असतांनाच डहाणू येथे हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांस राखी बांधून राष्ट्रीय एकात्मता व समतेचा संदेश दिला आहे.तसेही पुरोगामी महाराष्ट्रात समता कायम ठेवण्याचा इतिहास फार मोठा आहे.

        समतेचा विचार येणाऱ्या पीडिकरिता आदर्श ठरावा या उद्देशाने डहाणू मध्ये हिंदू भगीनीने मुस्लिम बंधूना राखी बांधून  समतेचा संदेश दिला. भाऊ व बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा प्रवित्र असलेल्या रक्षाबंधन सण यााआहे,भावा बहिणीचे प्रेमाचं प्रतिक आहे.

सगळे काही नाते टीकनारी असतात असे नाही परंतु संख्या भावा बहिनीचे प्रेम आणि मानलेल्या भावा बहिणीचे प्रेम अपरंपार आणि अतुट असते, त्यांना जात पात,जाती धर्माचे भेदभाव नसतो असे म्हणतात तेच खरे त्यांचा उदाहरण यानिमित्ताने पुढे आले आहे.

 नुकत्याच झालेल्या राखी सणाला डहाणूतील हिंदू भगीनी उज्वला ताई डामसे. नम्रत्रा हिरे .अनसुया पदेल यांनी मुस्लिम कार्यकर्ते व प्रत्रकार रफीक भाई घाची यांना राखी बांधून आपली निष्ठा व्यक्त केली आहे.