🔹राहुल साळवे यांनी केली सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मागणी

✒️माधव शिंदे (नांदेड ,जिल्हा प्रतिनिधी)मो:- ७७५७०७३२६

 नांदेड(दि.9ऑगस्ट):-जिल्ह्यात हिमोफिलिया फॅक्टर्स रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे तसेच वेळेवर ऊपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांचा मृत्यू हि होत आहे यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मागणी केली आहे कि.नांदेड जिल्ह्यातील हिमोफिलीया फॅक्टर्स रूग्णांसाठी नांदेड येथे डे केअर सेंटर सुरू करावे या मागणीची दखल घेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव मिलिंद कुळकर्णी यांनी दि १/६/२०२० रोजी आयुक्त.आरोग्य सेवा तथा अभियान संचालक.राष्ट्रिय अभियान यांना राहुल साळवे यांची आपले सरकार पोर्टलवरील मागणीची तक्रार पाठवली होती.

त्या अणुशंगाने दि २२/७/२०२० रोजी डाॅ.विजय कंदेवाड सहसंचालक (तांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या कडुन राहुल साळवे यांना एक लेखी पत्र देण्यात आले होते त्या पत्रात असे कळविले होते कि सद्यस्थितीत महाराष्ट्रात हिमोफिलिया रूग्णांसाठी एकुण ९ डे केअर सेंटर(मुंबई.ठाणे.नाशिक.पुणे.नागपुर.अहमदनगर.अमरावती.सातारा आणि औरंगाबाद) या ठिकाणी कार्यान्वित आहेत.

नांदेड जिल्ह्यासाठी औरंगाबादचे डे केअर सेंटर हे जवळचे आहे तसेच हिमोफिलिया फॅक्टर्ससाठी ऊपलब्ध होणारा निधी केंद्र सरकार कडून प्राप्त होतो त्यामध्ये वरील एकुण ९ D.C.C ला औषधांचा (हिमोफिलिया फॅक्टर्स) पुरवठा करणे शक्य होते त्यामुळे सद्यस्थितीत आपल्या जवळचे कार्यान्वित केंद्रातुन ऊपचार घ्यावा असे पत्र दिले होते या पत्राला प्रतिउत्तर देत राहुल साळवे यांनी हिमोफिलिया फॅक्टर्स रूग्णांसाठी औरंगाबाद हे डे केअर सेंटर दुर पडत असुन तिथपर्यंत पोहचण्या आधिच रूग्णाचा मृत्यू होत आहे तसेच मोठ्या प्रमाणात दिव्यांगत्व येत आहे यामुळे नजीकच्याच ठिकाणी उपकेंद्र तरी सुरू करावे जेणेकरून फॅक्टर्स रूग्णांना सर्व औषधोपचार मिळेल कारण २४ तास 8 नंबरचे फॅक्टर्स हे हिमोफिलिया फॅक्टर्स रूग्णांसाठी अत्यंत आवश्यक असते त्यामुळे नांदेड येथेच डे केअर सेंटरचे उपकेंद्र तरी सुरू करावे जेणेकरून नांदेड जिल्ह्यासह लातुर.हिंगोली.परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातील हिमोफिलिया फॅक्टर्स रूग्णांसाठी सोईस्कर होईल अशी मागणी राहुल साळवे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे केली असल्याचे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

नांदेड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED