राज्यात पाचशे रुग्णवाहिका खरेदी व आरोग्य विभागातील रिक्त पदे भरतीचा निर्णय -आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे

    96

    ✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी )मो:-9763526231

    सातारा( 9ऑगस्ट):- ‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी काळजी घेत आहे. अनेक ठिकाणी रुग्णवाहिका कमी पडत असल्याची बाब समोर आली असून, राज्यात पाचशे नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याचा व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा मुलाखतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

    कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील कोरोनाच्या पार्थभूमीवर अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रिफ,गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री टोपे म्हणाले, “सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाचा डबली रेट ९ते ९० दिवसांचा आहे. हा रेट कमी करायचा आहे. टेस्टिंगची संख्या वाढविल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. पण अजूनही टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. सातारा येथे टेस्टिंग लॅब नसल्याने त्यांना पुण्यावर अवलंबून राहवे लागत होते. पण सोमवार (दि. १०) पासूनसातारा येथे नवीन टेस्टिंग लॅब सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.”