🔺राष्ट्रीय ओ.बी.सी फाउंडेशन अमरावती जिल्हाध्यक्ष निलेश कोहळे यांचा भाजप सरकार वर आरोप

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.11ऑगस्ट):-कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील गणमुक्ति या गावात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने ओबीसी फाउंडेशन अमरावती जिल्हाध्यक्ष तथा स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष युवा तालुकाप्रमुख निलेश कोहळे यांनि यावेळी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मगगुत्ती गावच्या ग्रामपंचायतने ठराव घेऊन मुख्य चौकात गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता . परंतु काही नागरिकांच्या विरोधानंतर कर्नाटक सरकारने पोलिस बंदोबस्तात पुतळा हटविण्याचे आदेश दिले.त्यानंतर तेथील स्थानिक प्रशासनाने रात्रीतूनच पुतळा हटविला . यामुळे शिवभक्तांनमधे व माहाराष्ट्रात सर्व जनतेकडून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहेत. कर्नाटक मधील भाजपा सरकारने गनमुक्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला याबाबत राज्यतील व केंद्रातील भाजपाचे नेते काहिच बोलत नाहीत‌. गनमुक्ती या गावातील ग्रामपंचायत मध्ये ही भाजपची सत्ता आहे सरकारच्या दबावानेच हे कृत्य झाले.आम्ही अमरावती जिल्हाच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध करतो.. *शिव छत्रपतींचा आशीर्वाद असे म्हणणाऱ्या भाजपा सरकारचे शिवाजी महाराजां विषयी प्रेम फक्त मतांपुरतेच आहे असा आरोप सुद्धा..राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन जिल्हाध्यक्ष तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरुड युवा तालुकाप्रमुख निलेश कोहळे यांनी यावेळी व्यक्त केला* आहे व कर्नाटक मधील गनमुक्ती या गावामध्ये ज्या ठिकाणाहून पुतळा हटविला त्याच मुळं जागी तात्काळ भरण्यात यावा अशी मागणी *राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशनचे अमरावती जिल्हा अध्यक्ष तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका प्रमुख निलेश कोहळे यांनी यावेळी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेत.*

Breaking News, अमरावती, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED