मराठी साहित्य मंच प्रस्तुत ई-काव्य संग्रह अर्थात साहित्य पुरवणी चे ऑनलाईन प्रकाशन सिने अभिनेत्री प्रा.शालिनी सहारे-राऊत यांच्या हस्ते संपन्न

41

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.12ऑगस्ट):-साहित्य क्षेत्रातील नावाजलेला व्हाट्सअप ग्रुप मराठी साहित्य मंच प्रस्तुत साहित्य सेवेचा एक वसा म्हणून ई-काव्यसंग्रह अर्थात साहित्य पुरवणी प्रत्येक महिन्याला प्रकाशित करण्यात येते.या मध्ये नामवंत व नवोदित कवी-कवयित्रींच्या कविता वाचकांसमोर याव्यात या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येतो .या उपक्रमास पहिल्यापासुन ते या सहाव्या पुरवणीस देखील साहित्यप्रेमी लेखक व वाचक यांच्याकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बुधवार दिनांक १२/०८/२०२० रोजी दुपारी ठीक १२वाजून ०८ मिनिटे व २०सेकंदानी हा ऑनलाईन प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री,कवयित्री व व्याख्याता प्रा.शालिनी सहारे-राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला .

प्रकाशन सोहळा हा चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रा.शालिनी सहारे-राऊत यांच्या हस्ते संपन्न झाल्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या ई -काव्यसंग्रहात वेगवेगळ्या विषयावरील ३० कविता व साहित्यिक क्षेत्रातील नामवंत कवी कवयित्री यांचा परिचय या सदराखाली, दीपाली ताई गुरव (रहिमतपूर पोलीस स्टेशन,सातारा), राज्यस्तरीय कुसुमाग्रज पुरस्काराने सन्मानित काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर (साहेब),व सिने अभिनेत्री ,कवयित्री व व्याख्याता प्रा.शालिनी सहारे राऊत यांचा संपूर्ण परिचय प्रकाशित करण्यात आला आहे. या ई -साहित्य पुरवणीत प्रा.कु.श्रद्धा शेट्ये,कु.वर्षा शिदोरे,रिया रुपेश पवार,दीपिका क्षिरसागर, शालू कृपाले,मीना फाटे,शामल मांजरेकर, रोहिणी पराडकर,ऋणाली कचरे, वनिता मोडके-पवार,सागरराजे निंबाळकर, साधना ढवळे यांसह विविध नामवंत व नवोदित कवी-कवयित्रींच्या स्वलिखित रचना समाविष्ट आहेत.या सोहळ्यासाठी मीनाक्षीताई नागराळे मॅडम वाशीम यांचे विशेष सहकार्य लाभले.

         उपक्रम आयोजक तथा समुह प्रमुख काव्यरत्न प्रा. रावसाहेब राशिनकर (साहेब) व अंगदजी दराडे व नंदकुमार शेंदरे सर यांनी या ऑनलाईन सोहळ्याचे संपूर्ण व आयोजन नियोजन केले . व समूहात ऑनलाईन सोहळ्यात उपस्थित राहून अभिप्राय देणाऱ्या सर्व सारस्वतांचे आभार मानले.