श्रीगोंद्याचे सुपुत्र आणि अहमदनगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

31

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.14ऑगस्ट):-श्रीगोंद्याचे सुपुत्र व अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. हरीश दत्तात्रय खेडकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देण्यात येणारे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

श्री.हरीश खेडकर हे श्रीगोंदा येथील रहिवासी असून, त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा येथे झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे झाले.
श्री. खेडकर यांनी आपल्या सेवा कालावधीत अनेक खुनाचे गुन्हे आणि दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणले.

त्यांना आतापर्यंत ४३१ बक्षिसे ४५ प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत. त्यांनी नागपूर, जालना, पुणे, सातारा, बुलढाणा, ठाणे, बीड ,उस्मानाबाद, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यात २८ वर्ष सेवा केली. राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने त्यांचे श्रीगोंदा करांच्या वतीने प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी हार्दिक हार्दिक अभिनंदन केले आहे.

——————————————–————————–