✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.14ऑगस्ट):-स्व. रामनारायणजी काबरा हे अतिशय निर्मळ आयुष्य जगले. नांदेडच्या विविध सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचे योगदान मोलाचे होते. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी तळमळीने त्यांनी काम केले. शेवटपर्यंत त्यांनी आपला निरपेक्ष बाणा जपत दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांची सदैव तळमळ असायची या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या.
स्व. रामनारायणजी काबरा यांच्या घरी जाऊन त्यांनी परिवारातील सर्व सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.

  यावेळी श्रीमती सुशिलाबाई काबरा, प्रेमकुमार काबरा, संजय काबरा, शोभा बियाणी, नवीन काबरा, अमित काबरा, संकेत काबरा, कृष्णा काबरा, श्रीनारायण बियाणी व समस्त काबरा परिवार उपस्थित होते. काबरा परिवाराशी चव्हाण कुटूंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. सांत्वन भेटीत श्रीमती सुशिलाबाई काबरा यांनी रामनारायण यांच्या स्मरणार्थ संत रामचंद्र केशव डोंगरे महाराज यांचा भागवत नवनीत ग्रंथ काबरा परिवाराच्यावतीने पालकमंत्री श्री. चव्हाण यांना भेट दिली.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED