✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)
मो:- 8432409595

गेवराई(दि.19ऑगस्ट):-देशात कोरोनांच्या वाढत्या प्रमाणामुळे सार्वजनिक ठिकाणी पोळा सणासही इतरही सार्वजनिक सण, उत्सवाला बंदी घालण्यात आली.
दरवर्षी सर्जा – राजाच्या बैलपाळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असत, पंरतु देशासह जगात कोरोना महामारीने थैमान घातल्याने सार्वजनिक सण, उत्सावाला बंद घालण्यात आली, दरवर्षी छमछम वाजणारी बैलांच्या गळ्यातील घुंगरूमाळ मुकीच राहील, महाराष्ट्र सर्जा-राजाच्या बैलपोळ्याच्या सणाला फार महत्त्व आहे 

शेतकर्यांचा पोशींदा असणार्या सर्जा-राजाच्या बैलपोळा सणा कोरोनांचे संकट असल्याने बळीराजाचा अनंदच हारवला आहे, गावभर वाजतगाजत मिरवणूक, ठोल, हालकी , झाज,लेझीम तालावर सर्जा -राजाची मिरवणूक कढता आली नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिल्हाधिकारी यांनी बैलपोळा  आदेश दिल्यानंतर नियमांचे पालन करत सोप्या, साध्या पद्धतीने, शेतामध्येच सर्जा-राजाचा बैलपाळा सन साजरा करण्यासाचे शेतकरी बांधवांनी पसंद केले.

मनोरंजन, महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED