जय भगवान महासंघ जालना युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी दादाराव चौरे यांची निवड

  41

  🔹विविध पदांवर झाली अनेकांची निवड

  ✒️अंगद दराडे (बिड जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

  बीड (21ऑगस्ट):-जालना जिल्यात जय भगवान महासंघच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री बाळासाहेब सानप साहेब मराठवाडा अध्यक्ष सचिन भाऊ डोईफोडे जिल्हाध्यक्ष डॉ रमेश तारगे जिल्हाध्यक्ष गजानन ढाकणे विदर्भ अध्यक्ष उगलमुगले सर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सिद्धेश्वर आंधळे , ता .अध्यक्ष राजाभाऊ आघाव आष्टी शिध्देशोर राख दत्ता तिडके, प्रशांत मांन्टे ,यंगेश दराडे इत्यादी पदाधीकारी उपस्थीत होते .
  प्रदेश उपाध्यक्ष पदी डॉ सुभाषराव ढाकणे साहेब यांची निवड करण्यात आली. महिला जिल्हाध्यक्षपदी अर्चनाताई राऊत यांची निवड करण्यात आली ,युवा जिल्हाध्यक्ष पदी समाधान दराडे यांची निवड करण्यात आली. जिल्हा सरचिटणीस पदी सतीश दादा सानप यांची निवड करण्यात आली ,अंबड तालुका अध्यक्षपदी विष्णू वाघ यांची निवड करण्यात आली ,दादाराव चौरे यांची युवा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, घनसावंगी युवा तालुकाध्यक्षपदी बळीराम जायभाये यांची निवड करण्यात आली, परतुर युवा तालुकाध्यक्षपदी योगेश दराडे यांची निवड करण्यात आली, अंबड तालुका युवाअध्यक्ष पदी अशोक घुगे यांची निवड करण्यात आली.
  जय भगवान महासंघा कडून
  सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .