✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)
मो:-8308862587
हिंगोली(दि.25ऑगस्ट):-धार्मिक स्थळे, मंदिरे, भजन,कीर्तन कार्यक्रम चालू करण्यासाठी विश्व वारकरी सेनेच्या वतीने कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषराव बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. कोरोणाच्या महामारी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यातही खूप दिवस लॉकडाऊन होता. सध्याच्या परिस्थितीनुसार सरकार हळूहळू सगळीकडे लॉकडाऊन उठवत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या विश्व वारकरी सेनेच्या वतीने धार्मिक स्थळे,मंदिरे, भजन, किर्तन व कार्यक्रमे चालू करण्यासाठी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषराव बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्रजी शिखरे,हिंगोली चे नगरसेवक रामभाऊ कदम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे,गुड्डू बांगर व विश्व वारकरी सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.