केज तालुक्यातील रस्ते दुरुस्त करा

30

✒️नवनाथ पौळ(केज,विशेष प्रतिनिधी)
मो:-8080942185

केज(दि.२६आॅगस्ट):- केज तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच राज्य मार्ग हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्ती करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड केज तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
केज तालुक्यातील रस्ते हे अतिशय खड्डेमय झाले.

असल्याने तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अपघाताचे प्रमाण देखिल वाढले असून यातील काही रस्ते तर मागील उन्हाळ्यात झालेले असून काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे रस्ते जैसे थे झालेले दिसून येत आहेत या रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून नागरिकांना त्रास होणार नाही व अपघाताचे प्रमाण कमी होईल याची उपाययोजना कराव्यात ही विनंती संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे, जिल्हा सचिव विलास गुंठाळ, तालुकाध्यक्ष राहुल खोडसे, सतीश शिंदे, अमर घाडगे,संदीप शितोळे आदी उपस्थित होते.