महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

    49

    ?रयत क्रांती संघटनेच्या मागणीला यश

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.27ऑगस्ट):-कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यसचिवांनी मंत्रिमंडळाच्या बैठकित परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आले आहे.

    रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी राज्यात प्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनाच्या परिस्थिती घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणे होय त्यामुळे पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली होती.

    यावेळी पांडुरंग शिंदे म्हणाले की, आमचे नेते आ.सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री महोदयाकडे विनंती केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही संघटनेच्या व राज्यातील विद्यार्थ्यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा कोरणाच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलल्या मुळे आम्ही त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो व या निर्णयाचे स्वागत करतो.

    आम्ही मुख्यमंत्री व आयोगाच्या अध्यक्षांना विनंती करतो सर्व परीक्षार्थींना सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात यावी. पुढील वर्षाचे परीक्षेचे नियोजित वेळापत्रक सुद्धा जाहीर करावे.

    सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो सरकारने आपल्या आरोग्याच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून परीक्षेची चांगली करा व परीक्षा देण्यासाठी तयारीत राहावे.