कुंटूर येथे फ्रिजच्या स्फोटात तरूण गंभीर जखमी

    44

    चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी) मो:-93078969

    नायगाव(दि.25 आॅगस्ट):-च्या मध्यरात्री 12 च्या सुमारास फ्रिज मधील गॅसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत मारोती तानाजी देवदे वय 30 वर्ष हा तरूण गंभीर रीत्या भाजला गेला असुन त्याला पुढील उपचारासाठी नांदेड विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.सॅमसंग कंपनीच्या फ्रिज च्या स्फोटाची तिव्रता ईतकी भयंकर होती कि स्फोटानंतर लगेच आगीने रौद्र रूप धारण केले व त्यामध्ये तो गंभीर रीत्या भाजला गेला. स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी सामान जळून खाक झाले व भिंतीला पण तडे गेल्याचे निदर्शनास आले.