युवा मंच आंबोली च्या पुढाकाराने आंबोली येथे “लम्पि स्किन डिसीज”आजारावर उपचार शिबिराचे आयोजन

36

🔸252 जनावरांवर उपचार

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि 27ऑगस्ट):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिमुर क्षेत्रामध्ये जनावरांवर “लम्पि स्किन डिसीज”ह्या आजाराचा प्रादुर्भाव जनावरांवर दिसून येत आहे या रोगामुळे जनावरांच्या शरीरावर गाठी येण्याची लक्षणे आहेत अशातच पशुवैदकीय दवाखाना जे1 शंकरपूर च्या वतीने आंबोली गावामध्ये “लम्पि स्किन डिसीज ” या आजारावर उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या शिबिरामध्ये 252 जनावरांवर उपचार करण्यात आला यावेळी डॉ मेश्राम शंकरपुर , डॉ धनराज मेश्राम , डॉ धोटे साठगाव , डॉ कावळे जांभुळघाट , व परिचर राठोड , दारुडे , मेश्राम शंकरपुर , धरणे ,मडकाय लोहटकर परिचर उपस्तीत होते ,,इ.कर्मचारी उपस्तीत होते.

या शिबिराचे आयोजन ग्राम पंचायत आंबोली व युवा मंच आंबोली च्या वतीने करण्यात आले होते ,,यावेळी आंबोली ग्राम पंचायत चे पदाधीकारी व सरपंच रवी ठाकरे उपस्तीत होते व युवा मंच चे पदाधीकारी शरद वांढरे , आशिष चौधरी , दीपक लाकडे ,शुभम मंडपे , सुरज गजभे ,अभिलाष भषारकर , मधुकर नागपुरे , प्रमोद भषारकर , सुरेश गरमडे व गावातील गावकरी उपस्तीत होते हे उपचार शिबीर यशस्वी करण्याकरिता युवा मंच आंबोली च्या पंदाधीकाऱ्यांनी परिश्रम घेतले.