बरबडा येथिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    43

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

    नांदेड(दि.28ऑगस्ट):-नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गुणवंत विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यिनिचा सत्कार नरविर तानाजी मालुसरे वाचनालयाचे संचालक श्री. के.एन.जेटेवाड साहेब यांनी केले . इयत्ता दहावी व बारावी मध्ये 73% ते 85% गुण घेउन आपले भवित्व उज्वल करण्यासाठी दिवसरात्र परीश्रम घेउन आपल्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सत्तत प्रयत्न करणार्‍या होतकरु मुला मुलीचा सत्कार माझी सैनिक नंदराव केंद्रे माझी भुमिअभिलेख अधिकारी के.एन.जेटेवाड यांच्या हस्ते करण्यात आला. मागासर्वगीय व आदिवासी व इतर मुलामुलीच्या भावी जिवनात त्यांना प्रोत्सान मिळावे व भावी जिवनात यश संपादन करण्यासाठी त्यांना उर्जा मिळावी. म्हणुन जेटेवाड यांनी मुलीच्या घरी जाउन त्या मुलामुलीच्या आई वडीलासोबत शाल , पेन ,श्रीफळ, हार , साॅईनटायझर ची बाटली देउन सत्कार करण्यात आला. या वेळी कु.अनुजा माधव शेवाळे 10 वी 90% ,कु. कावेरी दिगांबर जेटेवाड 10वी 89% ,आदित्य कोडीबा हासेवाड 10 वी 75% , नागेश हांनमंत भंडरवाड 10वी 75% ,ओमकार मंगेश उलगुलवाड 10 वी 78% तर इयत्ता बारावी मधिल कु.निकीता दिलीप कांबळे 72:92% , कु. वैष्णवी गोविंद आनेमवाड 82:92%, कु. ज्ञानेश्वरी दिगांबर जेटेवाड 82:46%, कु.श्रद्धा दिलीप जेटेवाड 77% या सर्व मुलामुलीचां सत्कार करुण त्यांच्या पाटिवर शाबासकिची थाम मारत त्यांच्या कलागुणांना जाग्रत करण्याचे काम जेटेवाड यांनी केले या वेळी सुनिल प्रभाकर आनंतवार , विजय नंदराव केंद्रे , विश्वकर्मा पांचाळ ,कैलास जेटेवाड , सुर्यकांत जेटेवाड ,दिलीप कांबळे , सुनिल भंडरवाड, परमेश्वर उलगुलवाड ,बाळासाहेब कांबळे ,परमेश्वर जेटेवाड ,सौ. सुनिता माधव बैनवाड , सौ ताराबाई गुणाजी जेटेवाड, सौ आन्नपुर्णा दिगांबर जेटेवाड ,श्रीमती जिजाबाई शिवराम जेटेवाड उपस्थित होते.