कन्यारत्न झाले म्हणून आजीने सॅनिटायझर वाटून केला आनंद द्विगुणित

    89

    ✒️संतोष संगीडवार(आल्लपली प्रतिनिधी)मो:-7972265275

    आल्लपली(दि.28ऑगस्ट):-काही घरात आजही मुलगी जन्माला आली कि नाक मुरडतांना दिसतात परंतु अहेरी तालुक्यातील देचलीपेठा सर्कल, दोडगीर अंगणवाडी सेविका संगीता वडलाकोंडावार यांना 17/08/20 ला नातीन(कन्यारत्न) झाल्याने आज संपूर्ण अंगणवाडी सेविका ना सॅनिटायझर वाटप करून आनंद साजरा केला.
    कोरोनाचा पार्श्वभूमीवर देशात कोविड-19 ची साथ पसरलेली आहे. त्यात अनेकांना या रोगाची लागण होऊन कित्येक लोक दर दिवशी मृत्यूला कवटाळत आहेत. यापासून सावध राहण्याचे आव्हान शासनाद्वारे दर दिवशी प्रत्येक मार्गाने देशातील नागरिकांना सूचना देण्यात येतात. परंतु किती लोक याचे पालन करतात ते त्यांनाच माहित. मास्क लावणे, हातांना साबणाने धुणे, दोन मीटर शारीरिक दुरी ठेवणे, तसेच सॅनिटायझर वापरणे हे महत्वाचे असते. यात गावपातळीवर अंगणवाडी सेविका गावातील महिलांना,पालकांना, समजावत कोरोना योद्धा म्हणून लढत असते.कोरोना सारख्या आजाराला हरविण्यात अंगणवाडी सेविका हि महतवाची भूमिका निभावत असते. आज अहेरी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय येथे अंगणवाडी सेविकांची सभा झाली. याचे औचित्य साधून मुलगी हि घराची लक्ष्मी आहे, ती दोन्ही घरांना प्रकाश देते असा संदेश देत, सभेला उपस्थित असलेल्या सर्व अंगणवाडी सेविकांना देचलीपेठा सर्कल, दोडगीर येथील अंगणवाडी सेविका संगीता वडलाकोंडावार यांना नातीन (कन्यारत्न) झाल्याने आधी अंगणवाडी सेविकेला स्वस्थ असणे गरजेचे समझून अल्पोपहारावर खर्च न करता सॅनिटायझर वाटप करून आपला आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमात बालविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी बुर्रीवार सर, लिपिक भोगी मॅडम, व देचलीपेठा सर्कल चे पर्यवेक्षिका भगत मॅडम उपस्थित होते.