✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.29ऑगस्ट):-घनासावंगी येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने सर्व प्रार्थना मंदिरे चालु करण्यासाठी आंदोलन करण्यात आले या केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे,भाजपा जालना जिल्हाध्यक्ष संतोष दानवे,माजी आमदार विलासबापू खरात पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरील आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान भाजपा वतीने राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या *दार उघड सरकार दार उघड,दारू नको भक्तीचे दार उघड*…. अशा घोषणा देण्यात आल्या.

सदरील घंटानाद आंदोलन घनासावंगी येथे नरसिंह मंदिरासमोर करण्यात आले.यावेळी आंदोलनकर्त्यांनीं महाराष्ट्रातील सर्व धर्मीय प्रार्थना मंदिरे खुले करण्याची मागणी करण्यात आली.भाजपाच्या वतीने आरोप करण्यात आला की,केंद्र शासनाने प्रार्थना मंदिरे सुरू करण्याचे आदेश दिले असतानाही महाराष्ट्र सरकार महा विकास आघाडी याकडे दुर्लक्ष करीत आहे कोरणा व्हायरस मुळे गेली सहा महिन्यापासून मंदिर बंद आहेत मंदिर बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो लोकांचे जीवन या मंदिरावर चालतात गेली सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे त्या लाखो लोकांचा जीवन उद्धाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच महाराष्ट्र शासन महाराष्ट्रात दारूची दुकाने उघडते तर मंदिर उघडायला का हरकत आहे असा सवाल आंदोलन कर्त्यांच्या वतीने करण्यात आला. केंद्र सरकारने शासनाने दिलेल्या आदेशाला अनुसरून व दिलेल्या गाईडलाईन्स नुसार तात्काळ प्रार्थना मंदिरे उघडावेत अशी मागणी करण्यात आली. घंटानाद आंदोलन केले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे, डॉ रमेशराव तारगे, भाजप नेते देवनाथ जाधव, तात्यासाहेब चिमणे, अशोकराव जाधव, विष्णूपंत जाधव,शिवाजीराव पवार, उद्धव काकडे,बाळासाहेब बोरकर, भरतराव उगले, सुभाषराव घोगरे, संभाजीराव घोगरे, सुरेशराव पोटे, रघुनाथ सोसे,रघुनाथ मुकणे, बाबासाहेब हेमके, भरत परदेशी, ज्ञानदेव धांडगे, गजानन राजे जाधव, सिद्धेश्वर काकडे, महादेव काकडे, सुधाकर डहाळे, नंदू खाडे,यांच्यासह सर्व भाजपा कार्यकर्ते, शेतकरी, वारकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED