वारकऱ्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय लढ्यातील अग्रणी नेतृत्व म्हणजे अॅड बाळासाहेब आंबेडकर

121

वारकरी संप्रदायाचे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठू माऊलींच्या पंढरपूरात दि.31 अॉगष्ट रोजी कोरोनाच्या नावाखाली सरकारने बंद केलेले विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आणि मंदिरात पुर्वी प्रमाणेच देवदर्शन,पूजाअर्चा,भजन किर्तन करण्याची मुभा देण्यात यावी म्हणून विश्व वारकरी सेना व अन्य वारकरी संस्था, संघटनांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्व वारकरी सेनेच्या आग्रहाखातर या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर करण्याचे मान्य केले आहे. अॅड बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः दि 31 अॉगष्ट ला पंढरपूरात हजर राहून आंदोलनात अग्रभागी राहणार आहेत.

🔸वारकरी_संप्रदायात_उत्साह

कोरोना महामारीच्या नावाखाली सरकारने हजारो वर्षांची पूरातन परंपरा लाभलले श्री क्षेत्र पंढरपूर स्थित विठ्ठल मंदिर बंद केले. आषाढी एकादशीला पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीवरही यावर्षी सरकारने बंदी घातली. महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो कुटुंबात परंपरेने पायी दिंडी सोबत चालत चालत जाण्याची परंपरा सरकारच्या बंदीमुळे खंडित झाली. त्यामुळे वारकरी संप्रदायात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. विश्व वारकरी सेनेने सरकारच्या निर्णयाच्या विरोधात पंढरपूरात आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आंदोलक भक्तांवर गुन्हे दाखल केले.प्रश्न गंभीर होत असल्याचे पाहून विश्व वारकरी सेनेने दि.31 अॉगष्ट रोजी पंढरपूरात लाखो वारकऱ्यांसोबत मंदिर उघडण्याचे आंदोलन जाहीर केले. सोबतच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा बाळासाहेब आंबेडकरांनी या आंदोलनाचे नेतृत्व करावे म्हणून विश्व वारकरी सेनेने आग्रह धरला. बाळासाहेब आंबेडकरांनी ते मान्य केले.

अॅड बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः पंढरपूरात येऊन आंदोलनात सहभागी होणार आहे हे कळल्यावर समस्त वारकरी संप्रदायात-विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.अनेक जिल्ह्यातील वारकरी संघटनांनी मा बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर आमच्या दिंडीसह आम्ही आंदोलनात सहभागी होवू असे बाळासाहेबांना प्रत्यक्ष भेटून, जाहीर पत्रकाद्वारे, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शब्द दिला आहे.सर्वच स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळात आहे हि फार वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.

🔹अॅड_बाळासाहेब_आंबेडकरांवर_वारकरी_संप्रदायाचा_विश्वास_का_आहे ?

वारकरी संप्रदाय आणि बाळासाहेब आंबेडकर हे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत का ? तर नाही.
वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी सकारात्मक भूमिका घेतल्याचे आपल्याला आढळून येते.नव्हे वारकऱ्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय लढ्यातील अग्रणी नेतृत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर होत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यादृष्टीने काही उदाहरणे सांगता येतील.

🔸डाऊ_हटाव_आंदोलन 

पुण्याजवळील देऊ आळंदी हे वारकऱी संप्रदायाचे तिर्थस्थान आहे.परिसरातील इंद्रायणी नदीचे वारकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व आहे. या परिसरात 2008 मध्ये सरकारने DOW डाऊ केमिकल कंपनीला कारखाना उभारण्याची परवानगी दिली होती. भोपाळ विषारी वायू गळतीला दोषी असलेली हि कंपनी वारकऱ्यांच्या तिर्थक्षेत्री इंद्रायणी नदिच्या क्षेत्रात प्रदूषण वाढवेल असा भाविकांनी आरोप केला.यामधून जानेवारी2008 मध्ये एक मोठे आंदोलन उभे राहिले.या जन आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला. डाऊ हटावचा नारा देण्यात आला होता.वारकरी संप्रदायाचे बंड्यातात्या कराडकर, बाळासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.विधान भवनावर डाऊ हटाव संघर्ष समितीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. या संपूर्ण आंदोलनात बाळासाहेब आंबेडकर स्वतः सहभागी झाले. शेवटी सरकारला नमते घ्यावे लागले.परिणामी सरकारने डाऊ कंपनीला परवानगी नाकारली.या आंदोलनामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी वारकरी संप्रदायाचे मने जिंकली. आपसात एक विश्वास निर्माण झाला. या विश्वासाला कायम टिकवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः प्रयत्न केल्याचे दिसून येते.

🔸आमचा_मुख्यमंत्री_वारकरी

महाराष्ट्रात धर्माचे स्तोम माजवून राजकारण केले जाते.जाती जातीत तेढ निर्माण करून प्रसंगी जातीय दंगली घडवून सत्तेची पोळी शेकण्यात कट्टरवादी पक्ष,सरंजामशाही वृत्तीचे राजकारणी अग्रेसर असतात. परंतु समाजा समाजात जातीय सलोखा -एकोपा नांदला पाहिजे.जातीय विद्वेष -संघर्ष टाळण्यासाठी मानवी जीवनात चांगले सकारात्मक मूल्ये रूजली पाहिजेत.त्यादृष्टीने अवैदिक वारकरी संप्रदाय आणि आंबेडकरी समूह हे दोन्ही प्रवाह एकत्र आल्यास सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणता येईल असे व्यापक धोरण बाळासाहेब आंबेडकरांनी मांडल्याचे लक्षात येते.

2009 मध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या.विधानसभा निवडणूका पूर्ण तयारी निशी लढवून त्या जिंकण्यासाठी भारिप बहुजन महासंघाने तयारी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून 2009 मध्ये पक्षनेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रा रंजित मेश्राम सर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात भारिप बहुजन महासंघ पक्षाचे एकदिवसीय अधिवेशन घेण्यात आले होते.

या अधिवेशनात एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.अधिवेशनातील शेवटच्या टप्प्यातील अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब आंबेडकरांनी यावेळी जाहीर केले की, 2009 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाच्या वतीने “होणारा मुख्यमंत्री हा वारकरी असणार आहे.” प्रेक्षागृहात उपस्थित हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उभे राहून प्रचंड टाळ्यांच्या जल्लोषात बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.2005 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे पाच आमदार निवडून आले होते. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या वारकरी संप्रदायाला सोबत घेऊन वारकरी संप्रदायाचाच आपण मुख्यमंत्री करू शकतो असा विश्वास त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. दुर्दैवाने हा प्रयोग यशस्वी झाला नाही तो भाग वेगळा. परंतु एवढे मात्र निश्चित झाले की, वारकरी संप्रदायाला राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी मनाचा मोठेपणा दाखविली होता.

🔸मधुसूदन_महाराजांना_पाठबळ

हि घटना 2010 सालची आहे.भामचंद्र डोंगर मुंबईच्या जवळ आहे.याला ऐतिहासिक संदर्भ आहे. जगद् गुरु तुकाराम महाराजांनी येथे ध्यान धारणा करून गाथा लिहलेल्याचे सांगितले जाते.एवढेच नाही तर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज स्वतः संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी आल्याची नोंद आहे. अशा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर राष्ट्रवादीच्या बिल्डर लॉबीचे लक्ष गेले.व्यावसायिक दृष्टीने हा डोंगर परिसर घशात घालण्यासाठी बिल्डर लॉबी आणि त्यांचे पाठीराखे राजकारणी सरसावले. याला वारकरी संप्रदायाचे मधुसूदन महाराज यांनी विरोध केला.वारकऱ्यांचे संघटन केले.संत पंरपरा लाभलेल्या या परिसराचा विकास करून सरकारने हा परिसर वारकऱ्यांच्या ताब्यात द्यावा म्हणून मधुसूदन महाराजांनी वारकऱ्यांसह आंदोलन केले. विरोध केला म्हणून बिल्डरांच्या गुंडांनी मधुसूदन महाराजांना मारहाण केली.हि बाब बाळासाहेब आंबेडकरांना कळली. बाळासाहेब आंबेडकरांनी मधुसूदन महाराजांची पुण्यात भेट घेतली.प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्याचवेळी बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन मधुसूदन महाराजांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवला. सोबतच सरकारकडे चौकशीची आणि परिसराच्या संरक्षणाची मागणी केली.अशा पध्दतीने मधुसूदन महाराजांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या कार्याला पाठबळ दिले.

🔹सरकारने_वारकऱ्यांमध्ये_फूट_पाडू_नये:बाळासाहेबांचा_इशारा

आषाढी एकादशी म्हटली की पंढरपूरची वारी परंपरा समोर येते.महाराष्ट्रातुन,कर्नाटकातील काही भागातून आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने वारकरी दिंडी घेऊन शिक्षण शेकडो किलोमीटर पायी चालत पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरात येतात. मात्र कोरानाच्या व्हायरसच्या नावाखाली यावर्षी आषाढी एकादशीला सरकारने वारीवरच बंदी घातली.600-700 वर्षांची वारीची परंपरा सरकारने खंडित केली. यावर वारकऱ्यांनी सरकारकडे नाराजी व्यक्त केली. यावर तोडगा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्पुरता पर्याय काढला. प्रातिनिधीक स्वरूपात वारकरी संस्थांनी आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घ्यावे असे जाहीर केले. सरकारकडून जे वारकरी संस्थांचे नावे जाहीर केले होते त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातीलच संस्थांचा समावेश होता. हि बाब बाळासाहेब आंबेडकर कळल्यावर सरकारकडे त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रातिनिधिक वारीमध्ये विदर्भातील कोणत्याही वारकरी संस्थेचा समावेश न केल्याने सरकारला वारकऱ्यांमध्ये दुजाभाव करता येणार नाही,त्यांच्यात फुट पाडता येणार नाही म्हणून सुनावले.

🔹अकोल्यातील_राजराजेश्वराचे_मंदिर_उघडले_आणि_कावड_यात्रेची_परंपरा_खंडित_होऊ_दिली_नाही

अकोल्यात प्रसिद्ध राजराजेश्वराचे पुरातन मंदिर आहे. मंदिर 700 वर्ष पुरातन आहे.महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने दरवर्षी कावड यात्रा काढण्यात येते.श्रावणात शिवभक्त पूर्णेच्या पाण्याचा मंदिरात अभिषेक घालतात. मात्र कोरोना महामारीच्या नावाखाली स्थानिक प्रशासनाने गेली पाच महिने हे मंदिरच कुलूपबंद केले होते.भाविकांना पाच महिन्यापासून बंद असलेले राज राजेश्वर मंदिर उघडण्याची बाळासाहेबांना गळ घातली.बाळासाहेब आंबेडकरांनी सरकारच्या हिटलरशाही विरोधात जाऊन मंदिर समितीला विश्वासात घेऊन मंदिराचे दरवाजे उघडले. सोबतच स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून शेकडो वर्षांची जुनी कावड यात्रेची परंपरा खंडित करू नये म्हणून भूमिका घेतली आणि प्रातिनिधीक कावड यात्रा काढून शिवभक्तांना न्याय मिळवून दिला.बाळासाहेबांचे भूमिकेचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. धार्मिक स्तोम माजवून वर्षानुवर्षे राजकारणात फायदा उपटणाऱ्या राजकीय ठेकेदारांचे मात्र या घटनेमुळे चांगलेच पित्त खवळले होते. सोबतच केवळ मतांवर डोळा ठेवून धार्मिक बाबींचा उदोउदो करणाऱ्या राजकीय पक्षाचे नेते मात्र या घटनेने उघडे पडले.

🔸सरकारने_सामान्य_माणसाचे_जनजीवन_कुंठित_करून आर्थिक_टाळेबंदी_केली_आहे

कोरोना व्हायरसच्या नावाखाली सरकारने अवघे जनजीवन ठप्प केले आहे.सरकारने लोकांच्या खाजगी आयुष्यातही ढवळाढवळ चालवली आहे. अगदी सर्वसामान्य “जनतेच्या मेंदूवर ताबा” मिळवण्या इतपत केंद्र आणि राज्य सरकारने मजल मारली आहे.आम्ही म्हणू तसेच वागा असे सरकारचे असंवैधानिक धोरण दिसत आहे.

भारतीय राज्य घटनेने दिलेले धार्मिक स्वातंत्र्यावर सरकारने घाला घातला आहे. तब्बल सहा महिन्यांपासून सर्व धर्मियांचे प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली आहेत.मंदिरातील दैनंदिन धार्मिक विधी,पुजा अर्चना,भजने किर्तने, शेकडो वर्षाच्या ऐतिहासिक पारंपरिक यात्रा, मिरवणुका काढण्यावर सरकारने बंदी लादली आहे.सरकारने लादलेली हि बंदी म्हणजे भारतीय राज्य घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचे हनन होय.

🔹बंद_मंदिरे_आणि_थांबलेले_अर्थचक्र

राज्यात अनेक मोठेमोठे मंदिर संस्थाने आहेत. त्यापैकीच एक पंढरपूराचे विठ्ठल मंदिर होय.मंदिर बंद असल्याने मंदिराच्या भरवशावर असलेल्या अनेक उद्योग आणि व्यवसाय अवलंबून आहेत.भाविकांना बंदी असल्याने या परिसरात शुकशुकाट आहे. हातावर पोट असणारे हजारो लोकांपुढे आर्थिक विवंचना आहे.मंदिर पर्यटनाशी संबंधीत हॉटेल, लॉज, किराणा मार्केट,हार फुले, फळे,भाजीपाला, हातगाड्या,अॉटो पासून तर लक्झरी बस पर्यंतची वाहतूक व्यवस्था, मातीची ,पितळ -तांबे, लोखंडी वस्तूंची दुकाने, शेतकऱ्यांना उपयोग शेतीचे साहित्य अवजारे, लाकडापासून तयार केलेले खेळणी असोत कि दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे लाकडी वस्तू असोत,कुंकू गुलालापासून तर पुजेचे साहित्याचे किरकोळ विक्रेते,कपड्यांचे व्यवसाय सर्वांवर अवकळा आलेली आहे.संपूर्ण अर्थचक्र थांबलेले आहे. या दुष्टचक्रातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मंदिर उघडणे अतिशय आवश्यक आहे त्यामुळेच वारकऱ्यांसह अॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत दि 31 अॉगष्ट चे मंदिर उघडण्याचे नियोजित आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.मंदिर उघडण्याचे आंदोलन म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्यांपासून आर्थिक कोंडी फोडण्यासाठीचे आंदोलन आहे.

🔸विश्वास_वाढला

याआधी बाळासाहेब आंबेडकरांच्या आंदोलक भूमिकेमुळे सार्वजनिक एसटी वाहतूक सुरू झाली. दुकांने प्रतिष्ठाने उघडण्याचे अॉड इवन पध्दत बंद झाली,चहा टपऱ्या, पानटपऱ्या , उघडण्याला परवानगी दिली, जिम उघडायला- सलूनचे दुकाने उघडायला परवानगी देण्यात आली.या यशामुळे बाळासाहेब आंबेडकरांवरचा लहान मोठ्या व्यापाऱ्यांपासून तर घाऊक किरकोळ व्यापारी, फिरवाल्यापर्यंत सर्वांचा विश्वास वाढले आहे.

✒️लेखक:-सुरेश शिरसाट
अकोला जिल्हा
मो:-98503 58305

▪️ संकलन
नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185