✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

अंबाजोगाई(दि.2सप्टेंबर):-तालुक्यातील राडी येथील तरुणाने स्वतःच्या फायनान्सच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.०१) सकाळी उघडकीस आली. योगेश इंद्रजीत गंगणे (वय २६, रा. राडी) असे त्या तरुणाचे नाव आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळ योगेशचे स्वतःचे फायनान्स आहे. सोमवारी रात्रीतून कधीतरी त्याने फायनान्सच्या कार्यालयात पत्र्याच्या लोखंडी आडूला नायलोनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मंगळवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दरम्यान, योगेशने कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.योगेशचे चुलते शिवाजी रामचंद्र गंगणे यांच्या जबाबावरून अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED