कंफर्ट झोन

35

काही निर्णय घेण्यास अत्यंत कठीण होऊन बसतात, पण ते समर्थ पणे घेण्याचं सामर्थ्य परिस्थितीने एकदा निर्माण केल, की आयुष्याची ‘दशा’ “दिशे” मध्ये आपसुकच परावर्तित होते.

दोन्ही दगडांवर पाय ठेऊन वाट चालायची ठरवली की मग तोंडावर पडणे अनिवार्य आहे.

स्वतःचा आवाज ऐकायचा असेल, तर एकांतातच ऐकायला मिळेल आणी स्व-संवाद ही तेव्हाच शक्य होईल नाही का?एक् तर व्यक्त व्हाव, किंवा स्वछंद पणे स्वतःच योग्य तो निर्णय घेऊन मुक्त व्हाव.मानसिक अन शारीरिक हाल करुन, मिळवलेला पैसा समाधानाच आयुष्य कधीच देऊ शकत नाही.
कुठ आणी कसं थांबयचं हे ज्याच त्याला कळायला हव. आपल्या शारीरिक अन् मानसिक सहनशक्तीच मोलमापन करायचं गणित जमल की आयुष्याच्या पेपर प्रथम श्रेणित उत्तिर्ण झाल्यातच जमा.
समजुतदारपणा आणी संस्काराच्या दबावाखाली न पटणाऱ्या आणी विशेष करून न पेलणाऱ्या गोष्टि करून,जीवाचे वाटेल तसे हाल करणे, हा शुद्ध मूर्ख पणा आहे.

आपल्या सभोवतालच्या प्रत्तेक व्यक्तीने स्वतःभोवती आपल्या “कंफर्ट झोन” च एक् वलय आखलय,अन् कुणीही त्या-बाहेर सहजा सहजी पडायला तयार होत नाही.

परदेशात,पर-राज्यात राहाणाऱ्या आपल्या पालकांना आपल्या सहवासाची गरज आहे हे माहित असूनही,गडगंज पगाराची नौकरी अन अंगवळणी पडलेले रुटीन सोडायला जड़ जाणारी मुले, मुलगा व सून दोघेही नौकरीत व्यस्त असतानाही, केवळ गाव सोडून करमत नाही म्हणून आपल्याच नातवंडांना मुलांच्या गरजेच्या वेळेस संभाळण्यास असमर्थ ठरणारे आजी-आजोबा,फार काय तर करिअर मध्ये तडजोड करायला लागू नये म्हणून, आपल्याच मुलांना आजी-आजोबा कडे शिकायला पाठवणारे आई-बाबा, अशी काही उदाहरणे हल्ली फार सहज पणे पाहायला मिळतात. अर्थात प्रत्येक व्यक्ती आपल्या जागी बरोबरच, तुम्ही कुठल्या दृष्टीकोनातून पाहता आणी कुठल्या जागेवरून पाहता ते जास्त मह्त्वाचे. पण वास्तविक दृष्टीकोनातून पाहायला गेल तर् वरील उदाहरणातील प्रत्येक व्यक्ती स्वतःस सुखी ठेवण्यास धडपडताना दिसतों जे अगदीच योग्य आहे. ज्याला हे जमत नाही त्याच्याकरता मात्र आयुष्य म्हणजे न संपनारा “suffer” होत जाते.

म्हणून वाटत,प्रत्येकाने आपला असा एक “कंफर्ट झोन” बनवयलाच हवा. कुठपर्येंत ताणल की तुटणार नाही याचं मोजमाप आता तरी शिकाव लागेल. मग ती स्वतःची क्षमता असो वा आजूबाजूची परिस्थिती, रोजच्या न संपणाऱ्या “Suffer” ला “Suhana Safar” मध्ये बदलण्याचा मंत्र आता तरी आपला आपण शोधुया.एकाच वेळी सर्वांना सुखी ठेवता येणे अशक्य आहे, पण सर्वात आधी स्वतःला सुखी ठेवायचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.

✒️लेखिका:-रेणुका व्यास,पुणे-मो:-8378995535

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620