✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.3सप्टेंबर):-काही महिन्यांपासून मुळुकवाडी येथील रखडलेल्या रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्यास आज सुरुवात झाली आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने सुनिल ठोसर यांनी रस्त्याच्या कामाला गती मिळावी म्हणून सतत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आजपासून कामाला गती मिळाली आहे. या कामाची पाहणी सुनिल ठोसर हे लवकरच करतील.

या रस्त्याच्या कामाला गती मिळाल्यामुळे सर्व ग्रामस्थांमधुन आणि प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.. सुनिल ठोसर यांच्या पुढाकारामुळे मुळुकवाडी मधील गोर गरीब जनतेची गैरसोय थांबली आहे. व त्यांच्या चहरे अदी खुश झाले..मादळमोही सर्कल प्रमुख अभिषेक वाघ
हे सुनिल ठोसर यांचे विशेष आभार व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED