ईगल फाउंडेशनचे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर

    38

    ✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

    बीड(दि.5सप्टेंबर):-ईगल फाऊंडेशनच्यावतीने कोरोना महामारीच्या कालावधीत तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींची राष्ट्रीय गरूडझेप पुरस्कारासाठी निवड केल्याची घोषणा आज ईगल फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष श्री सागर पाटील , सचीव शेखर सुर्यवंशी ,प्रमुख पदाधिकारी प्रकाश वंजोळे,श्री बाबासाहेब राशिनकर, सुभाष भोसले,प्रा.तुकाराम पाटील , प्रा.स्मिता गिरी,श्री संजय नवले, प्रा.महेशकुमार मोटे,प्रा.सर्जेराव राऊत, श्री अशोक शिंदे,श्री राजेश जोष्टे यांनी केली.

    गौरवमुर्ती मध्ये राजकीय क्षेत्रात येवल्याचे आमदार नरेंद्र दराडे सामाजिक क्षेत्रातील अँड.संभाजीराव मोहिते पाटील प्रशासकीय क्षेत्रात सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा नलावडे,श्री गणेश शेळके उद्योग क्षेत्रात उद्योजक श्री निलेश चव्हाण ,उद्योजक अर्थ विषयक प्रख्यात लेखक श्री डी.एस.काटे, महिला विकास क्षेत्रात डॉ.सौ.भुमिका प्रतापसिंह बेरगळ उद्योजिका सौ.पुनम पाटील ,सामाजिक क्षेत्रात श्री पोपट नलावडे, सौ.संगिता शिवाजी शिंदे माजी सैनिक श्री खंडू दुधभाते सरपंच श्री शिवलाल राठोड वैद्यकीय क्षेत्रात डॉ.संजय थोरात,पत्रकारीता क्षेत्रात श्री प्रशांत चव्हाण,श्री श्रीकांत सोनवणे ,कला क्षेत्रात श्री भारत चव्हाण राजकीय, क्षेत्रात श्री रामकिशन रौंदळे, शिक्षण क्षेत्रातश्री शिवाजी चव्हाण, प्रा.सतिश साठे, प्रा.सुभाष हुलपल्ले,श्री अभिमन्यु शिंदे,पाकिजा उस्मान पटेल श्री राहूल कुंभार श्री निवृत्ती सदगीर,श्री विजय विश्वासराव, श्री सागर भाट,श्री धनाजी बेलेकर,श्री सुरेश राजे, श्रीम मनिषा चौधरी,आयेशा नदाफ, तर उच्च शिक्षण क्षेत्रात डॉ.जितेंद्र अहिरराव, प्राचार्य हरिदास विधाते यांचा समावेश आहे वरील सर्व मान्यवरांना ईगल फाऊंडेशन या सेवाभावी व नोंदणीकृत संस्थेच्या वतीने आकर्षक मानपत्र ,सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ, देवून दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात येणार आहे. लवकरच कार्यक्रमाचे नियोजनही कळविण्यात येणार आहे.