बीड डिसीसी ही किसान क्रेडीट कार्डचे माध्यमातून कर्ज वितरण करणारी महाराष्ट्रातील एकमेव बँक- रमेश पोकळे

40

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.7सप्टेंबर):-चांदेगांव सेवा सहकारी सोसायटीच्या शेतकरी सभासदांना खरीप हंगाम 2020 -21 करिता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पीक कर्ज वितरण कार्यक्रम आज बीड जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या माध्यमातून बँकेचे चेअरमन आदित्यजी सारडा यांच्या हस्ते तर भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाऊ पोकळे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलिमभाई जहाँगिर, भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निलभैय्या गलधर प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बोलतांना रमेशभाऊ पोकळे म्हणाले की,महाराष्ट्राच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या माध्यमातून जिल्हाभरातील शेतकर्‍यांना जवळपास 150 कोटी रूपये किसान क्रेडिट कार्डद्वारे विना तारण बिनव्याजी पीक कर्ज वाटप करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदित्य सारडा यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने केले आहे. शेतकर्‍यांना किसान के्रडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज वाटप करणारी बीड डिसीसी ही महाराष्ट्रातील एकमेव बँक असल्याचे रमेश पोकळे यांनी मत व्यक्त केले.

यावेळी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदित्यजी सारडा बोलतांना म्हणाले की जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना पिक कर्जा बरोबरच कृषीपुरक उद्योग व्यवसायाकरिता देखील कर्ज देण्याच्या विविध योजना आगामी काळात करणार असुन, जिल्ह्यातील शेतकर्‍यांना विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे आर्थिक योगदान जिल्हा बँक देईल असा विश्वास यावेळी आदित्य सारडा यांनी व्यक्त केला.