वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने सातारा शहरात 15 ऑक्सिजन मशीन घेऊन कोरोना रुग्णांना घरपोच सेवा

34

🔹विविध उपक्रम राबविण्यात वात्सल्य संस्था अग्रेसर

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.8सप्टेंबर):-वात्सल्य सामाजीक सेवा भावी संस्था सातारा ही गेली ६ ते ७ वर्षे समाजकार्यात अग्रेसर आहे ५ रुपयात डाळ भात हा अतिशय चांगला उपक्रम ६ ते ७ महिने राबवला होता,परंतु नाका परिसरात रोड चे काम चालू झाले आणि तो थोडे दिवस थांबवला आहे 
माणुसकीची भिंत ही योजना सलग ५ महिने राबवली होती आणि जवळजवळ १२ ट्रक कपडे गोळा केले होते
आज सातारा शहरात १५ ऑक्सिजन मशीन घेऊन कोरोना रुग्णांना घरपोच आणि मोफत सेवा पुरवत आहोत ज्या रुग्णांना बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत आणि त्यांची ऑक्सिजन पातळी ९० पेक्षा कमी झाली असेल तर त्या रुग्णांना अतिशय चांगला फरक या मशीन ने पडत आहे.

सर्व संस्था ज्यांनी मशीन घेतल्या आहेत किंवा येणार आहेत त्या सर्वांना एकत्र घेऊन सातारा शहरासाठी ऑक्सिजन बँक चालू करण्याचा मानस आहे वृक्षारोपण, वारकरी लोकांना जेवण,ऊस वाहतूक करणारे ट्रॉली ना मोफत रेडियम, दत्तक विद्यार्थी, माणुसकीची भिंत, नो टोबॅको रन,कास साफसफाई,क्रीडा क्षेत्र मदत,५ रु मध्ये जेवण अशे अनेक सामाजिक उपक्रम वात्सल्य सामाजिक सेवा भावी संस्थेच्या वतीने राबवले जातात.