महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे व व पर्यटन मंत्री श्री.आदित्यजी ठाकरे यांची 70/30 चा फार्मूला रद्द केल्यामुळे आमदार संतोषराव बांगर, डॉ. राहुल पाटील बालाजी कल्याणकर यांनी भेट घेऊन मानले आभार

    43

    ✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

    सेनगाव(दि.8सप्टेंबर):-राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा व 30 टक्के राज्यस्तरीय कोटा या धर्तीवर प्रवेश करण्यात येत होते. त्यासाठी उर्वरित महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ असे तीन विभाग कार्यरत करण्यात आले होते. ज्या प्रादेशिक विभागातून उमेदवार बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल त्या उमेदवारांसाठी त्यासंबंधित प्रादेशिक विभागातील महाविद्यालयांमध्ये 70 टक्के जागा राखीव असतात त्यामुळे मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते.

    परंतु ती पद्धत बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आता कसली अडचण येणार नाही. त्यामुळे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.संतोषराव बांगर, परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील व आमदार श्री.बालाजी कल्याणकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे व पर्यटन आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्यजी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.