आम आदमी पार्टी’ च्या शिरुर तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर

31

✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.8सप्टेंबर):-महाराष्ट्रभर आम आदमी पार्टी’ ने शिरुर तालुक्यातील राजकारणात प्रवेश केला आहे. ‘आम आदमी पार्टी’ चे पुणे जिल्हा अध्यक्ष व पक्ष प्रवक्ते श्री. मुकुंद किर्दत व पुणे जिल्हा संघटन मंत्री डाॅ. अभिजित मोरे यांनी शिरुर येथील कार्यकर्त्याच्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर केली. तत्पूर्वी प्रसिद्ध ब्लॉग लेखक, कवी, पत्रकार व अभ्यासक डॉ. नितीन पवार यांना पक्षप्रवेश देण्यात आला व राज्यभरातील त्यांचे सहकारी क्रमाक्रमाने ‘आम आदमी पार्टी’ त प्रवेशित होण्यासाठी करण्यात आले. त्यांच्या इच्छेनेच त्यांची निवड ‘पुणे जिल्हा सहसंघटक’ म्हणून करण्यात येउन त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील ‘आम आदमी पार्टी’ चे संघटन कार्य सोपवण्यात आले व नियुक्ती पत्र देण्यात आले. शिरुर तालुक्यातील ‘वकील आघाडी’ची जबाबदारी अॅड. विलास जाधव यांचे कडे तर ‘डाॅक्टर आघाडी’चे नेतृत्व डाॅ. संदिप जगताप यांचेकडे सोपवण्यात आले. यावेळी श्री.मुकुंद किर्दत यांनी आम आदमी पार्टी सरकार ने दिल्लीत केलेल्या कामांची माहिती दिली. आणि हेच महाराष्ट्रात आम आदमी पार्टी ला जनहितार्थ करायचे असल्याची ग्वाही दिली. डाॅ. अभिजित मोरे यांनी देशातील विभिन्न राज्यातील पक्षाच्या घोडदडी ची माहिती दिली.

डाॅ. नितीन पवार यावेळी म्हणाले, ‘शिरुर शहर गेली 50 वर्ष एखाद्या संस्थानासारखे झाले आहे व एका उद्योगपतीचे खाजगी संस्थानकच जणू बनले आहे. नगरसेवक नामधारी बनले आहेत. ही ‘भांडवलशाही’ केवळ ‘आम आदमी’ म्हणजे सर्व सामान्य माणूसच मोडुन काढू शकतो.’ कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-तालुका संयोजक -श्री. दिनेश कोल्हे,सह संयोजक अक्षय- नरवडे,सहसचिव- अभिजीत डुबे, महिला आघाडी प्रमुख- सौ.सुनिता वंजारी,युवक आघाडी प्रमुख- सुमित कल्याणकर,सोशल मिडीया प्रमुख- साहिल सय्यद,वाहतूक आघाडी प्रमुख – सोमनाथ रंधवे,खजिनदार- सौ.सुनिता मेश्राम. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कोल्हे यांनी केले तर अॅड. विलास जाधव आदींनी आभार मानले.