सर्व संघटनांना सोबत घेऊन ऊसतोड कामगारांचा लढा तीव्र करणार – प्रा.शिवराज बांगर

47

🔹वंचित बहुजन आघाडी बीड मध्ये घेणार ऊसतोड मजूरांचा लवकरच मेळावा

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185

केज(दि.8सप्टेंबर):-वंचितांचे बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या महाराष्ट्रातील ऊस तोड कामगार, मुकादम आणि वाहतूकदार यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. जो पर्यंत हा लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि सर्व समविचारी संघटना यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा केला जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा सध्या बाळासाहेब आंबेडकर हे या ऊसतोड कामगारांच्या आंदोलनामध्ये उतरणार असून, आता साखर कारखान्याचा मालक ऊसतोड कामगारांचा नेता प्रतिनिधी होणार नाही, अशा प्रकारची भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे.

1)पाच वर्षाचा करार तीन वर्षाचा झाला पाहिजे. 2)दीडशे पट भाव वाढ मिळाली पाहिजे
3) मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे
4) वाहतुकीच्या दरामध्ये वाढ झाली पाहिजे
यासह अनेक मागण्या घेऊन बीड जिल्हा ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार संघटना संघर्ष समिती ही या बीड जिह्यामध्ये आंदोलन उभे करीत असून त्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कामगार नेते डॉ. डी.एल कराड कामगार नेत्या सुशीलाताई मोराळे माजी आ. जनार्दन तुपे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष ऊसतोड कामगार नेते प्रा. शिवराज बांगर कॉम्रेड मोहन जाधव यासह अनेक संघटना आणि पदाधिकारी या आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेणार असून येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यातील कोयता बंद आंदोलन पुकारण्यात येईल व साखर संघाच्या आणि दादागिरीला न जुमानता एक व्यापक असे आंदोलन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व सर्व संघटनांना सोबत घेऊन या जिल्ह्यांमध्ये उभे केले जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी दिली आहे.