कंगना राणावतच्या फोटोला आरपीआय डेमोक्रॅटिक कडून चपलांचा मार

    56

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(दि.8सप्टेंबर):- भारतीय संविधान, आरक्षण, मुंबई पोलीस तर मुंबई प्रदेश बद्दल अपशब्द काढल्यामुळे आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
    राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कंबळे यांच्या आदेशावरून राज्य महासचीव पँथर श्रावण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली फिल्मसिटी च्या मुख्य प्रवेश द्वारा वर तीव्र निदर्शने करण्यात आली.कंगना राणावत ने माफी नाही मागितल्यास तीचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

    केंद्रीय महासचिव डॉ पँथर राजन माक्निकर यांच्या नेतृत्वात पंतगर श्रावण गायकवाड यांनी आंदोलनात महत्वाची भूमिका गाजवत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.सर्वप्रथम आर पी आय राज्य बंजारा सेल राज्य प्रमुख शिवाभाई राठोड यांच्या हस्ते कंगना राणावत च्या तसविरिस चपलांचा हार घातला तर केंद्रीय महासचिव डॉ राजन माक्निकर यांनी कंगना राणावत हिच्या प्रतिकात्मक तसविरिस चपलांने झोडपून काढले.

    कंगना राणावत मुरदाबाद, मुंबई पोलीस जिंदाबाद, भारतीय संविधानाचा विजय असो या घोषणा देण्यात आल्या.प्रास्ताविक व सूत्र संचालन दिलीप जाधव यांनी केले तर कार्यक्रम यशवितेसाठी स्वप्नील गायकवाड, संतोष चौरे, विशाल हिवाळे, विजय गाडेकर, विशाल कांबळे, गाऊतं गाडेकर यांनी कार्यक्रम यशवितेसाठी अथक परिश्रम घेतले.