आलापल्लीत दाऊदचा पुतळा जाळण्यात आला

    35

    🔺अशा धमकीला मराठी माणूस घाबरत नाही – विलास पोचमपल्लीवार (शिवसेना)

    ✒️संतोष संगीडवर(आलापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

    आलापल्ली(दि.9सप्टेंबर):-मुख्यमंत्री यांचे निवास स्थान असलेले मातोश्री ला उडविण्याची धमकी दाऊद इब्राहिम याने दिली. त्या विरोधात आलापल्ली येथे विलास पोचमपल्लीवार प्रभारी तालुका प्रमुख अहेरी यांचा मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांसोबत दाऊद इब्राहिम चा फोटो जाळून घोषणा देत निषेद करण्यात आला.

    मातोश्री महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान आहे. असे मातोश्री ला उडविण्याची धमकी देणारे बागौडा दाऊद इब्राहिम त्याचा बापाचा धमकीला मराठी माणूस घाबरत नाही. त्याला हिम्मत असेल तर भारतात येऊन दाखवावे. मातोश्री म्हणजेच आमचे पुज्यनीय हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब च आहेत असे समजतो. अशा फुकटचा धमकीला न घाबरता प्रत्येक मराठा व शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत आहेत. असे विलास पोचमपल्लीवार शिवसेना प्रभारी तालुका प्रमुख अहेरी यांनी म्हटले. यावेळी आलापल्लीतील शिवसैनिक रुपेश सल्लम, नागेश कोमपेल्ली, गुरु मामा, लक्ष्मण तोगरवार, इत्यादी उपस्थित होते.