जवाहर नवोदय विद्यालय , नवेगांव (खैरी) जि. नागपूरच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे वृषालीच्या उपचारासाठी आर्थिक मदत

    41

    ✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.9सप्टेंबर):-तालुक्यातील झिलबोडी येथील वृषाली दिगांबर शेन्डे या तीन वर्षीय बालिकेला दि. ०७ सप्टेंबरला पहाटे ४ वाजताच्या दरम्यान अत्यंत विषारी प्रजातींच्या पट्टेरी मन्यार सापाने दंश केल्यामुळे तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे व नंतर ख्रिस्तानंद रूग्णालयात दाखल करण्यात आले.ही बातमी दि. ०८ सप्टेंबरला जवळपास सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आली. बातमीमध्ये वृषालीच्या वडीलांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

    या वृत्ताची दखल घेत नागपुर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय, नवेगांव (खैरी) येथील माजी विद्यार्थी संघटना (सन १९८८-१९९५) तर्फे वृषालीला उपचाराउपचारासाठी ५००० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
    माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी अरविंद रामकृष्ण मसे यांनी ५००० रुपये रोख वृषालीचे वडील दिगांबर शेन्डे याचेकडे सुपूर्द केले. त्याबद्दल दिगांबर शेन्डे यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे आभार मानले.यावेळी संघटनेचे पदाधिकारी, वृषालीचे कुटुंबीय व ख्रिस्तानंद रूग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.