औंढा नागनाथ येथील डॉ. श्रीकांत जयवंतराव संघई यांच्या निधनानंतर श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित

    73

    ✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष,प्रतिनिधी)

    मो:-8308862587

    सेनगाव(दि.9सप्टेंबर):-औंढा नागनाथ येथील डॉ. श्रीकांत जयवंतराव संघई यांच्या निधनानंतर औंढा नागनाथ येथील वैद्यकीय असोसिएशनच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

    या कार्यक्रमास उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. संतोषराव बांगर यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक रामभाऊ कदम, अनिलभाई देशमुख, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, नगराध्यक्ष राम मुळे, शहरप्रमुख अनिल देव, डॉक्टर दीपक मुंडे, डॉक्टर अभय देशपांडे, डॉक्टर रघुनाथ बेंगाळ, डॉक्टर प्रदीप सोनी यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी आणि बंडू चोंडेकर, गंगाधर पोले,मनोज देशमुख, माधव गोरे हे उपस्थित होते. यावेळी दीर्घ आजाराने दुःखद निधन झालेल्या रामभाऊ खुळेखुळे यांच्या देखील कुटुंबीयांची भेट घेऊन आमदार श्री.संतोषराव बांगर यांनी सांत्वन केले.