परभणी चे जिल्हाधिकारी यांना प्रकाश अवचार यांच्या नेतृत्वात लोककलावंत यांनी दिले निवेदन

30

✒️परभणी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

परभणी(दि.9सप्टेंबर):-कोरोना महामारी मुळे राज्यात २२/३/पासून टाळे ब़दी ने सर्वत्र सामान्य जनता हवालदिल झालेली आहे अशातच कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रचार प्रसाराचे कार्य हे सर्व बंद पडल्यामुळे कलावंतांवर व उपासमारीची वेळ आलेली आहे कारण ् त्यांच्या कडे उपजीविकेचे साधन नसल्यामुळे कलावंतांचे सुद्धा सर्वत्र अतोनात हाल होत आहेत म्हणून शासनाने त्यांना आर्थिक सहकार्य करणे गरजेचे आहे कलावंत जगेल कला जगेल कलावंत शिवाय समाजप्रबोधन होत नाही कलावंत हा समाजाचा मुख्य घटक आहे कोणत्याही कार्यक्रमात कलावंताचे अत्यंत असते माणसाच्या आयुष्यात जन्मा पासून मरे पर्यंत कलावंताची गरज असते आजपर्यंत कलावंतांवर अशी वेळ कधीच आली नव्हती कलावंतांनी कधीच काही कोणती तक्रार केली नाही त्यामुळे कलावंतांच्या मागण्यां शासनाने मंजूर करायला पाहिजेत मागण्या वाजवी व रास्त आहेत.

सादर केलेल्या निवेदनात प्रचार प्रसाराचे कार्यक्रम त्वरित सुरू करावे,अर्ज भरताना वयाची आठ पंचेचाळीस वर्षे करावी, कलावंतांच्या पाल्यांना ऑनलाइन शिक्षणा साठी लागणारे शालेय साहित्य व शाळा कॉलेजची फी शासनाने भरावी ,सामाजिक न्याय विभागाचे जनहिताचे सर्व प्रचार प्रसाराचे कार्यक्रम कलावंतांना देणे सुरू करावे ,कोरोना असेपर्यंत गरजू कलावंतांना अंत्योदय योजनेचे 35 किलो राशन मिळावे ,जिल्हास्तरीय कलावंत मानधन निवड समित्या स्थापन करून सदर समिती यावर शासन पुरस्कृत प्रतिभावंत गुणवंत प्रतिष्ठित नामांकित योग्य उमेदवार कलावंताची निवड करावी त्याच प्रमाणे सदर समितीवर शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना सुद्धा अपंग कायदा 1995 नुसार व 2017चा अपंग कायदा यानुसार अपंग व्यक्तीला ही प्राधान्य देण्यात आलेले आहे म्हणून त्यांचाही प्राधान्याने विचार करावा,कोरोना काळात भरमसाठ आलेले विजेचे बिल कलावंतांना माफ करावे, अनुदानाची रक्कम प्रति महिना पाच हजार रुपये करावे व कलावंतांना 50 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात यावे,आदी मागण्याचा समावेश आहे.