बाळापूर राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा वंचित मध्ये प्रवेश

16

✒️ समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

बाळापुर(दि.9सप्टेंबर):-बाळापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते प्रवेश केला.

यामध्ये रवि प्रभाकर आवटे, तुळशीराम श्रीनाथ, अब्दुल मजीद (कॉंग्रेस), मंगेश किल्लेकर, नारायण फकिरा बोरकर (मा. शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मागा. से.),नागेश भालतिलक (शहर सचिव राष्ट्रवादी काँग्रेस)श्रावण माल्ते, बलदेवसिंग कछवा,हिरालाल खारोले,नंदु मेसरे,दिनेश किल्लेकर,मनोज मेसरे,विजय पंडे (माजी सैनिक, ग्राहक सेवाकेंद्र संचालक), रवि हिरळकरअजय सोनोने प्रकाश हनसरे(राष्ट्रवादी काँग्रेसचे),नितीन मानकर (राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडी)यांनी बाळापुर येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहिर प्रवेश केला.

कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासह,जिल्हा प्रवक्ता धमेंद्र दंदी,जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे, विकास सदांशिव,मंगेश गवई, गुलाब उमाळे मेजर, चंदु दांडगे, गणेश सुरजशे, सुहास इंगळे, भुषण पातोडे, रामराव सावळे, प्रमोद गवई,प्रा. समाधान सावदेकर, शेख शारिक, विलास वानखडे, संतोष कात्रे, संजय उमाळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.