शिक्षक दिनी उपक्रमशील शिक्षिका विद्या नाईक यांचा अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे गुणगौरव

84

🔸अग्निपंख फाऊंडेशनच्या कोकण विभागीय समन्वयक पदावर नियुक्ती

✒️पालघर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पालघर(दि.9सप्टेंबर):- विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास हाच ध्यास उराशी बाळगलेल्या राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने तसेच इतरांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने, त्यांचा सत्कार व गुणगौरव करण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होवून दिनांक १६ डिसेंबर २०१७ ला मा. मिलिंद कुबडे, मा. नितीन भालचक्र, मा. दिपक मेश्राम, मा. ओंकार चेके व मा. गजानन गोपेवाड या सर्व संस्थापक सदस्यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने ‘अग्निपंख फाऊंडेशन’ महाराष्ट्र राज्य या समूहाची स्थापना करण्यात आली.

विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील मनाचे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी सदैव कटीबद्ध असलेले, विद्यार्थी हिताचे शैक्षणिक व सहशालेय उपक्रम अभिनव पद्धतीने राबवणारे , लेखन, कविता निर्मिती व गायन क्षेत्रात अग्रेसर, सामाजिक कार्यात सदैव तत्पर विशेषतः अग्निपंख फाऊंडेशन साठी पूर्णतः समर्पित असल्याने संस्थापक मंडळ व निवड समितीने सौ विद्या नाईक यांच्यावर विश्वास दाखवत यांना अग्निपंख फाऊंडेशनच्या कोकण विभागीय समन्वयक पदी नियुक्ती केली.

सौ विद्या नाईक या नेहमीच आदिवासी भागात करी करताना आदिवासी मुलांचे प्रश सोडवून अध्यापनात येणाऱ्या अडचणींवर मात करून मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन करतात,2010 साली अस्थिव्यंग मुलीला व्हाईलचेअर देऊन त्या मुलीचा शाळेत येण्याचा प्रश्न मिटवला, सद्या क9विद काळात मुलांच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण व उपासमार होताना पाहून त्यांनी स्वतः 50 धान्य चे किट वाटप केले.

पाड्यातील लोकांना 50 बॉटल आर्सेनिकगोळ्या वाटप केले,प्रत्येकाला मास्क वाटप केले,अभ्यासासाठी वह्या ,पेन,पेन्सिल,रबर अशा वस्तू वाटप केल्या,स्वाध्याय प्रतीचे झेरॉक्स करून लिखाणासाठी अभ्यासासाठी वाटप केले, तसेच मुलांच्या आरोग्य विषयक सवयी जोपासण्यासाठी हॅन्ड वॉश चे ही वाटप केले.सद्या पर्यावरण मित्र स्वयंसेवी संस्था भारत येथे महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक म्हणून काम पाहते 

लसन 2019।20 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार,मनुष्य बळ लोकसेवा अकादमी यांच्यातर्फे ऑनलाइन 5 सप्टेंबर 2020 साली प्रदान झाला.पर्यावरणीय कामाचा गौरव म्हणून राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार प्राप्त झाला आहे.कोविड काळात केलेली मदत आणि सेवा यासाठी कोविड योद्धा म्हणून सन्मान पत्र प्राप्त झाले आहे.