“थँक्स अ टीचर” अभियानात शुभम मंडपे यांचा सत्कार

34

🔸दहा स्वयंसेवकांसोबत विहारात व मंदिरात शिकविणे केले सुरू

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.11सप्टेंबर):-थँक्स अ टीचर अभियानाला सुरुवात केंद्र हिरापूर पंचायत समिती चिमूर कडून करण्यात आली यावेळीं या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माननीय रामदास राणे होते यात विषय शाळा बंद शिक्षण सुरू उपक्रम व यशोगाथा सादरीकरण माननीय अशोक गायकवाड केंद्रप्रमुख हिरापूर यांनी केले व ,मी कोविड योद्धा अनुभव कथन श्री प्रबुद्ध डांगे सहाय्यक शिक्षक हिरापूर व कोविड १९ काळातील शिक्षणावर परिसंवाद श्री रूपचंद बनसोड सहाय्यक शिक्षक हिरापूर यांनी मनोगत व्यक्त केले.

कोरोना काळातील आंबोली येथील शुभम मडपे यांनी दहा स्वयंसेवक सोबत घेऊन विध्यार्थ्यांना विहारात व गावातील सर्व मंदिरात शिक्षण देने सुरू केले त्यामुळे त्यांचा सत्कार हिरापूर व शंकरपूर बिटाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करन्यात आला व शुभम मंडपे आपले मनोगतही मांडले कार्यक्रमाचे संचालन श्री.सचिन शेरकी व आभार प्रदर्शन श्री. भिमराव शेंडे यांनी केले.

कार्यक्रमास श्री.सुनिल मुनघाटे शा.व्य . समिती उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. दिनकर फटिंग विषय शिक्षक भाषा , कु. आशुलता चौरे विषय शिक्षक विज्ञान यांनी मोलाचे योगदान दिले. सदर कार्यक्रमास हिरापूर केंद्रातील सर्व व्यवस्थापनाचे मुख्याध्यापक उपस्थित होते.