कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नेरी दुकान लाईनची वेळ एक तासाने कमी

29

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.११सप्टेंबर):-चिमुर तालुक्यातील नेरी येथे कोरोणा संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावाभुळे येथील व्यापारी असोसिएशने दुकानाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यत फक्त सूर राहणार असल्याचे निश्चित केले आहे
यापुर्वी दुकानाची सुरू करण्याची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंतची होती ,ति आता एका तासाने व्यापारी युनियनकडुन कमी करण्यात आली आहे
नेरी ग्रामपंचायत मध्ये आज सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.

मिटिंगला नेरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कामडी,सचीव रवींद्र पंधरे,महसूल विभागाचे कर्मचारी नेरी सर्कल आर. आय निखाडे, ,नेरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम सर, हेड काँस्टेबल विजय वरगंटीवार,काँस्टेबल रवी आठवले,रोशन तामशेटवार ,आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजेश कोवाचे ,आरोग्य सेवक वाघ,ग्रामविकास अधिकारी व्हि ऐल मेश्राम ,ग्रामपंचायत कर्मचारी किशोर कामडी, क्रिष्णा ढोले ,गोलु गराटे आदी उपस्थित होते यावेळी डाँ.कोवाचे यांनी आज गावात सात कोरोणा पाँझीटिव्ह रुग्णाची नोंद झाल्याचे सांगितले.

त्यामुळे उपस्थित अधिकारी यांनी गावामध्ये वाढत्या कोरोणा संक्रमणामुळे जनतेने सावध राहावे समुहात जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा सुरक्षित अंतर ठेवावे अत्यावश्यक सेवा असेल तरच घराबाहेर पडावे अशा सूचना केल्या आहेत .