✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.12सप्टेंबर):-मराठा आरक्षण संघर्ष करत असताना अनेक संकटे समाजाने एकत्र येऊन पेलले सर्व वाटचालीत भरीव योगदान आहे अश्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद… सर्व शहीद झालेल्या सर्वांना जय जिजाऊ महाराष्ट्रात सर्वाधिक लोसंख्येचा समाज असल्यामुळे सर्वात मोठे नेतेही मराठा समाजातील सर्वात मोठी संख्या आमदारही समाजाचे आहेत ते कोणत्याही पार्टी , सरकार, विरोधात असूद्या बहुंतश नेते मूग गिळून सभागृहात बसत होते हे समाजाने लक्ष्यात ठेवणे गरजेचे आहे मत जनतेचे गुलाम पार्टीचे अशीच स्थिती झाल्यासारखी वाटते सर्व मोठमोठाले कारखाने, शाळा, कॉलेज सह विविध संस्था या थोड्याच लोकांच्या ताब्यात असून यांच्यात बारी बारी सगळे सुरू असून यातील शोकडो एकर शेती असणारे हजारो एकरचे मालक समाजाच्या जीवावर झाले आहेत समाजातील शेकडो एकर जमीन दार भूमिहीन करण्याचे महापाप केले आहे हे पाप कुठे फेडणार हाच प्रश्न समाजातील बुजुर्ग मंडळी बोलत आहेत राज्यात संस्था, उद्योग,बँका आदी विविध यंत्रणेमार्फत फक्त समाज सार्वजानिक, सामूहिक सुधारणा करण्या अगोदर आपली सुधारणा करण्यात आजही गुंतलेले आहेत.

यांना फक्त निवडणुका तोंडावर आल्या की समाज,सोयरे,पाहुणे, रावळे कुणाचे नाते गोते कुठे आहे याच्या याद्या करून निवडणुका जिंकून घेऊन सत्ता, खुर्ची महत्वाची आहे अनेक नेते मंडळी मारणाऱ्या माणसाला दवाखाना शासनाच्या विविध योजनांचा फायदा होईल याकडे कुठलेही लक्ष नसून निवडणुकीच्या वेळी टेंगळ येईपर्यंत पाय पडून समाजाचा घात केला? आपल्या आपल्या मतदासंघातील कुठल्या गावात लग्न, कुणी चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केली आहे याकडे आपले कार्यकर्ते सत्कार, सांत्वन यामध्ये प्रामुख्याने धन्यता मानतात यांना मी आजचं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो सगळ्या आमदारांनी विधानसभेत किती दिवस सभागृह तहकूब केले, किती वेळा गदारोळ केला फक्त स्वतःची पब्लिक सिटी करण्याचा गोरज धंदा केला आहे का असा प्रश्न समाजातील लोक बोलत आहेत काही समाजातील छोट्या समाजातील छोट्या संख्येत असणाऱ्या आमदार, मंत्री असताना समाजाच्या पिढ्यांन पिढ्या नाव राहील अश्या काही नेत्याचे नाव आज देवासमान समाज घेतो यात शंका नाही हे मराठा समाजातील अनेक नेत्यांना आदर्श घेण्यासारखे आहे.

कितीही गंभीर परस्थिती मधून कितीही शिक्षण घेतले तरी आरक्षण आडवे असल्यामुळे अनेकांनी जीवन संपवले, मोठ्या प्रमाणावर शेतकरी मराठा समाजातील असून शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून सगळे आमदार गपचीप सभागृहात बसतात मी अनेक वेळा पाहिले अपक्ष आमदार सभागृहात बाहेर, संघटना कायम यावर आवाज काढतात पार्टी नेत्याचे गुलाम बनलेले सदस्य बोलायला तयार नसतात यापुढे समाजाच्या विकासासाठी विविध प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचे राजकारण थांबवा नेत्याची गुलामी बंद ठेऊन समाजाच्या हितासाठी मुक मोर्चे सर्वांनी पाहिले आता ठोक मोर्चे सर्वांना दाखवावे लागतील यात शंका नाही सर्व समाज बांधवांनी यावर चिंतन करून पाऊले उचलली पाहिजेत असे आमचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना सुनील नानासाहेब ठोसर पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED