मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात सेवा सप्ताहाचे आयोजन

83

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बीड(दि.12सप्टेंबर):-लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या अथक परिश्रमातून बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात भारतीय जनता पक्षाचे विचार रुजले. प्रचंड संघर्षातून बीड जिल्हा घडवला.आज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात भाजपाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतम ताई गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात भाजपाची घोड-दौड चालू आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विचार आणि कार्य पोहोचून पक्षाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन भाजपाचा बालेकिल्ला मजबूत करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हा कार्यकारणी बैठकीत केले आहे.

नव्याने घोषित झालेल्या बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक आज बीडमध्ये संपन्न झाली. 14 सप्टेंबर 20 सप्टेंबर या दरम्यान देशभरात सेवा सप्ताहाच्या माध्यमातून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सेवा सप्ताह व विविध सामाजिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी आज बीड जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आयोजित केली होती. या बैठकीला माजी आ. तथा प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष केशव दादा आंधळे, प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष रमेश पोकळे, प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष ॲड. वाल्मीक निकाळजे, प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष सलीम जहांगिर, प्रदेश अनुसूचित जाति मोर्चा कार्यकारणी सदस्य श्री अजय सवाई, विजयकुमार पालसिंगनकर, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, भगवान सेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर ढाकणे,माजी सभापती सोमनाथराव माने,महादेवराव जमाले, प्रल्हादराव धनगुडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपाध्यक्ष-सर्वश्री शिवाजी मायकर, दादासाहेब गिरी,संजय आजबे,अनिरुद्ध उर्फ बंडू शिंदे,सुधीर घुमरे,ॲड.संगीता धसे,विक्रांत हजारी,बबनअण्णा झांबरे, सरचिटणीस-सौ.सविताताई गोल्हार,ॲड.सर्जेराव तांदळे,प्रा.देविदास नागरगोजे, कोषाध्यक्ष-चंद्रकांत फड, सचिव- नवनाथ शिराळे,राजेंद्र बांगर,बबन सोळंखे,सुंदर चव्हाण,मधुकर गर्जे,शंकर देशमुख,सौ.मीराताई गांधले,अतुल देशपांडे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष-नीलकंठ चाटे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदावर अमोल तिपाले,संजय सानप,मनोज पाटील,प्रदीप गंगणे यांची तर युवा मोर्चा जिल्हासरचिटणीस पदी अजय भीमराव धोंडे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष-सौ.उषाताई रमाकांत मुंडे,भटक्या विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष-डॉ.लक्ष्मण जाधव,वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष-डॉ.वासुदेव नेहरकर,विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष-संग्राम बांगर,दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष-धनंजय घोळवे,तालुकाध्यक्ष सर्वश्री स्वप्नील गलधर-बीड, भगवान केदार-केज,प्रकाशकाका सुरवसे-गेवराई,बाळासाहेब चोले-धारूर,पोपटराव शेंडगे-वडवणी,अरुण राऊत-माजलगाव हे उपस्थित होते.यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा फेटा बांधून व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

चौकट

या बैठकीत जिल्हा सचिव श्री शंकर देशमुख यांनी खा.डॉ.प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. कोरोना आपाद्काळात खा.डॉ.प्रीतमताई गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हा प्रशासनातील र्व प्रमुख अधिकार्यांशी संपर्क ठेवला. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन सेवा कार्याच्या माध्यमातून कठीण परिस्थितीमध्ये सापडलेल्या गोरगरीब वंचित ऊस तोड कामगार यांना किराणा कीट अन्नधान्य, मास्क,सॅनिटायझर,आदी रूपाने मदत करून त्यांना दिलासा दिला सातत्याने संपर्कात राहून जनतेची काळजी घेतली. महिला खासदार असूनही मुंबईहून थेट कोरोना रुग्णापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदना जाणून घेऊन आपले कर्तव्य बजावले. या कार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला टाळ्यांच्या गजरात या ठरावाला मान्यता देण्यात आली.

यावेळी खालील नेत्यांनी बैठकीस संबोधित करताना म्हटले आहे कि,केशव आंधळे-स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी संघर्ष करून राज्यातील ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांचा वारसा घेऊन लोकनेत्या पंकजाताई मुंडे ऊसतोड कामगारांसाठी सदैव तत्पर असून कामगारांच्या हितांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या समर्थ आहेत.
रमेश पोकळे-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा ताबा होता. हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आपल्या भागातील नवीन मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय भूमिका पार पाडावी आगमिकाळातील प्रत्येक निवडणूका जिंकण्यासाठी सज्ज असावे.

ॲड.वाल्मिक निकाळजे- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब गोरगरीब- वंचितांचे नेतृत्व होते. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी त्यांची तळमळ होती. म्हणूनच साहेबांनी अनेक दीनदुबळ्या व वंचितांना सत्तेची संधी देऊन प्रतिष्ठा मिळवून दिली.
ॲड.सर्जेराव तांदळे- काही अतृप्त माणसे कार्यकर्त्यांच्या मनात हवा भरण्याचे काम करतात. त्यांच्या पासून कार्यकर्त्यांनी सावधनता बाळगावी.संघटनेचं काम करत असताना कार्यकर्त्यांनी शिस्तीने व समाधानाने पक्षकार्य केले पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यावर नेतृत्वाची नजर असते योग्यवेळी प्रत्येकाची कदर केली जाते.

नीलकंठ चाटे- भारतीय जनता पार्टीमध्ये कार्य करण्यासाठी युवकांना प्रचंड संधी आहे.राजकीय परिवर्तनासाठी युवकांची ताकद महत्वाची आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी युवकांची फळी निर्माण करून उपेक्षित कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल.
सौ.उषाताई मुंडे- लोकनेत्या पंकजाताईंमुळे महिलेच्या बहुजनांचं नेतृत्व पुढं आलं आहे.भारतीय जनता पार्टीत महिलांना मान आणि सन्मान दिला जातो. राजकारण व समाजकारणात समान संधी दिली जाते. चंद्रकांत फड यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करून सेवासप्ताह उपक्रमांची माहिती कार्यकर्त्यांपुढे मांडली तर जिल्हा सचिव नवनाथ अण्णा शिराळे यांनी आभार व्यक्त केले.
या बैठकीला शांतीनाथ डोरले,सुभाष धस,सचिन उबाळे,अनिल चांदणे,बालाजी पवार, शरद झोडगे,किरण बांगर, बन्सीधर हावळे सर, इर्शाद भाई, विलास बामणे,अमोल वडतिले,दत्ता परळकर,भूषण पवार,कपिल सौदा,नरेश पवार,कल्याण पवार,संभाजी सुर्वे,लता मस्के,अनिता जाधव,शैलजा मुसळे,शीतल राजपूत,लता राऊत,शरद बडगे,पंकज धांडे, राकेश बिराजदार,अजय ढाकणे,सरपंच वसंत गुंदेकर, वैजिनाथ नेवाळे,बद्रीनाथ जटाळ,महेश सावंत,अनिल शेळके,बंडू मस्के,भीमा मस्के,अनुरथ मस्के,रवी कळसाने,दिलीप डोंगर,कृष्णा बहिरवाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.