गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात यावी

29

🔹शिवसेना नेते सुभाष घुटे यांची मागणी

✒️संतोष संगीडवार(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

आल्लापल्ली(दि.14सप्टेंबर):-गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यासाठी काही मूठभर व्यक्तीनी प्रयत्न केले, मात्र जनभावनेचा विचार न करता केलेली दारूबंदी पूर्णतः फसलेली आहे,दारूबंदी करतांना जिल्ह्याचा अभ्यास केला गेला नाही,करीता दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी हटऊन वाईन शाप सुरु करण्यात यावे अशी मागणी शिवसेना नेते सुभाष घुटे यांनी केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात सुभाष घुटे म्हणतात, गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो, या जिल्ह्यांमध्ये 50 टक्केच्या पेक्षा आदिवासी असून त्यांच्या चालीरीती प्रमाणे जन्मापासून तर मरणापर्यंत ज्या काही पूजा पाठ होतात त्यामध्ये त्यांना दारू ची आवश्यकता असते परंतु ह्या जिल्ह्यातील एक-दोन शहाण्या व्यक्तींनी आपले वर्चस्व या जिल्ह्यामध्ये ठेवण्याकरता या जिल्ह्यामध्ये दारू बंद करण्यात शासनाला भाग पडले आणि त्यांची संस्कृती व परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाकरिता सर्व आवश्यक असल्यामुळे हे आदिवासी बांधव घरी दारू करण्याचा प्रयत्न करतात व त्याला पोलीस वाले पकडण्याचा प्रयत्न करतात ह्यामुळे ह्या आदिवासी जिल्ह्यातील जनतेमध्ये शासनाविषयी भरपूर राग आहे या जिल्ह्यामध्ये दारू बंद करून हा 25 वर्षे उलटून गेली दारू बंद करण्याचा उद्देश हा होता की ह्या लोकांचे जीवनमान उंचावू परंतु त्यामध्ये काहीच फरक पडला नाही उलट याठिकाणी विषारी दारुमुळे या जिल्ह्यांमध्ये दररोज तीन ते चार व्यक्तीत गावात आहे व पोलीस विभाग आदिवासीं लुटत आहे तरी महोदय साहेबांना विनंती आहे की चंद्रपूर जिल्ह्यात सोबत गडचिरोली जिल्ह्यातील सुद्धा दारूचे दुकान सुरू करण्यात यावे ते खालील पद्धतीने चालू करण्यात यावी.

प्रत्येक तालुक्यामध्ये वाईन शाप पद्धतीने देण्यात यावी जेणेकरून ती व्यक्ती घरी नेऊन त्याचे सेवन करेल आणि त्याचा त्रास ही तर नागरिकांना होणार नाही आणि सुव्यवस्था याला कोणताही बाधा पोहोचणार नाही.