सातारा जिल्ह्यातील विविध योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतना वैभव गिते

75

✒️ समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)मो:-8552862697

सातारा(दि.15सप्टेंबर):- सातारा जिल्ह्यातील विविध योजनेचा आढावा सामाजिक कार्यकर्ते मा.वैभव गिते घेतला असुन यात खूप गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
सहाययक आयुक्त समाजकल्याण सातारा यांच्याकडील मिनी ट्रॅक्टर च्या योजनेस सहा महिन्यांपूर्वी पासून शासनाचा निधी आलेला नाही.

दलित वस्ती सुधार योजनेचा निधी प्रलंबित आहे.तांडा सुधार वस्ती ची प्रकरणे प्राप्त झाली नाहीत.कोरोना कोविड 19 या विषाणूचे कारण देत शासनाचा मागासवर्गीयांवर अत्याचार सुरू आहे.याबाबत लवकरच मंत्रालयीन अधिकारी यांच्याशी या संदर्भात भेटणार घेऊने याचा पाठपुरावा करणार असल्याचे एनडीएमजे संघटणेचे राज्य सचिव मा वैभव गिते यांनी सांगितले आहे.

यावेळी सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष निवृत्ती (तात्या)रोकडे.विधी सल्लागार ऍड. धुमाळ साहेब,पत्रकार वीर ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे हे उपस्थित होते.